Sunday 3 September 2023

1. E. क्रांतिकारी चळवळी

 

E. क्रांतिकारी चळवळी :

 

अ.                                            

अभिनव भारत

१९०४

वि दा.सावकार

आ.                                           

गदर पार्टी

१९१३

लाला हरदयाळ

इ.                                              

अनुशिलन समिती व युगांतर चळवळ

१९०६

अरविंद घोष, वीरेंद्र घोष, भूपेंद्र दत्त

ई.                                              

हिंदुस्थान सोश्यालीस्ट रिपब्लिकन असो.

१९२८

चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू 

 







­क्रांतिकारी चळवळीच्या उदयाची कारणे :

(सूचना : जहालांच्या उदयाची कारणे व क्रांतिकारी चळवळीच्या उदयाची कारणे सारखीच आहेत)

अभिनव भारत (१९०४) : स्वातंत्र्यवीर सावरकर

                           नाशिकमधील भगूर या गावी एक मध्यमवर्गीय कुटुंबात विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. पुण्याचा अत्याचारी प्लेग कमिशनर रँड ची हत्या चाफेकर बंधूनी केली चाफेकर बंधूना फाशीची शिक्षा झाली. या घटनेचा खोलवर परिणाम सावरकरांच्या बालमनावर झाला. त्यांनी कुलदेवतेसमोर समोर, ‘मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून अखेरच्या क्षणापर्यंत मी शत्रूशी लढत राहीन’ अशी शपथ घेतली. लोकमान्य टिळकांच्या जहालविचारांचा सावरकरांच्या विचारसरणीवर प्रभाव पडला होता.

१.                                             अभिनव भारत संघटनेची स्थापना (१९०४) :

                           नाशिकमध्ये हायस्कूलला शिकत असताना विनायक सावरकरांनी विध्यार्थ्यांना संघटीत करून १९०० साली ‘मित्रमेळा’ ही संघटना स्थापन केली. देशभक्तीने पेटून उठलेल्या तरुणांचा गट मित्रमेळयात संघटीत झाले. पुढे विनायक सावरकर व त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी मित्रमेळयचे रुपांतर १९०४ मध्ये ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेत केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करणे हा या संघटनेचा उद्देश होता. १९०५ साली बंगालच्या फाळणीच्या विरोधी बहिष्काराची चळवळ सुरु झाली. त्यावेळी सावरकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. लोकमान्य टिळकांच्या प्रभावाखाली सावरकरांनी परदेशी कपड्याच्या होळ्या पेटवल्या. स्वदेशीचा पुरस्कार केला.

२.                                             सावरकर लंडनला ‘इंडिया हाउस’ मध्ये गेले :

                           लंडनमध्ये राहून श्यामजी कृष्ण वर्मा भारताच्या स्वातंत्र्यासाठी गुप्तरित्या क्रांतीकरी चळवळ चालवत होते. यासाठी त्यांनी लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ स्थापन केले होते. भारतातून लंडनला शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय येथे केली होती. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी सावरकर लंडनला गेले. लोकमान्य टिळकांच्या शिफारशीने सावरकराना इंडिया हाउस तर्फे ‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळाली. सावरकरांच्या येथे येण्याने इंडिया हाउस तरुण क्रांतिकारकांचे केंद्र बनले. पंजाबी तरुण लाला हरदयाळ त्यापैकी एक होते त्यांनी पुढे गदर चळवळ सुरु केली.

३.                                             जोसेफ मॅझेनीचे चरित्र’ व ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथ लिहिले:

                           इटलीच्या एकीकरणाचा आद्यप्रणेता जोसेफ मॅझेनी याचे चरित्र सावरकरांनी १९०६ साली लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन भारतात करण्यात आले. क्रांतीकारी विचारणे भारावून गेलेल्या लोकांच्या उडया या पुस्तकावर पडल्या, हे पुस्तक हातोहात खपले.

                           १८५७ च्या उठावाला १९०७ साली ५० वर्षे होणार झाली. तेंव्हा ब्रिटीश सरकारने या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्याला उत्तर म्हणून सावरकरांनी इंडिया हाऊस मध्ये ‘भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध’ म्हणून या घटनेचा महोत्सव साजरा केला. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात १८५७ चा उठाव ‘शिपायांचे बंड’ नसून तो ‘भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा’ होता, असे प्रतिपादन केले. सरकारने प्रकाशनापूर्वी या ग्रंथावर बंदी घातली. पण क्रांतिकारकांनी गुप्तरित्या या ग्रंथाचे प्रकाशन केले. बाहेरून कादंबऱ्यांचे आवरण व आतून हा ग्रंथ असे करून अनेक ग्रंथ भारतात पाठवण्यात आले. हा ग्रंथ अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणाग्रंथ बनला.

४.                                            मदनलाल धिंग्राने कर्झन वायली ला गोळ्या घातल्या :

                           सावरकर लंडनला गेले तरी सावकारांचे बंधू बाबाराव सावरकर भारतात अभिनव भारत चे काम करत होते. इंग्रजांच्या विरुद्ध लोकांच्या मनात असंतोष निर्माण व्हावा म्हणून काही कविता बाबाराव यांनी प्रसिद्ध केल्या. त्या पोलिसांना सापडल्या. त्याबद्दल नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याने त्यांना जन्मठेपेची शिक्षा केली. इंग्लंडमधील इंडिया हाऊसवर पाळत ठेवून असलेला कर्झन वायली हा अधिकारीही या जन्मठेपेच्या मागे होता. अशाप्रकारे शिक्षा केल्यास दहशत निर्माण होईल असे त्यांना वाटत होते. तथापि त्याचा परिणाम उलटा झाला. क्रांतिकारकांनी याचा सूड घेण्याचे ठरविले. इंडिया हाऊस मधील क्रांतीकारकांना पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यातीलच एक तरुण मदनलाल धिंग्रा याने क्रांतीकारकांना त्रास देणाऱ्या कर्झन वायलीला गोळ्या घालून ठार केले. त्याला फाशीची शिक्षा झाली. फासावर जाण्यापूर्वीच्या जबानीत मदनलाल म्हणाला, “मला वाटते की, जे राष्ट्र गुलामगिरीत असते ते नेहमीच युद्धजन्य स्थितीत असते. मला बंदूक मिळाली नाही म्हणून मी पिस्तुलाचा वापर केला. माझ्यासारख्या किरकोळ देहयष्टीच्या व मंदबुध्दीच्या भारतमातेच्या पुत्राजवळ आपल्या रक्ताशिवाय आपल्या मातेस देण्यास अन्य काय असणार? परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना कि, मला परत माझ्या मातृभूमीत जन्म मिळू दे आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी परत फासावर जाण्याची संधी मिळू दे.”

५.                                            अनंत कान्हेरेने कलेक्टर जॅक्सन चा वध केला :

                           इकडे नाशिकमध्ये बाबाराव सावरकराना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या कलेक्टर जॅक्सनबद्दल क्रांतिकारकांच्या मनात प्रचंड राग होता. लंडन मधून भारतातील क्रांतीकाराकाना मोठ-मोठ्या पुस्तकातून पिस्तुला भारतात पाठवल्या होत्या. याच पिस्तुलाचा वापर करून नाशिकचा क्रांतिकारक अनंत कान्हेरे याने जॅक्सनला गोळ्या घातल्या. कान्हेरेला फाशीची शिक्षा झाली. याशिवाय आणखी तीन सदस्यांना फाशीची शिक्षा झाली. ३४ जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा झाल्या. हा खटला ‘नाशिक कट’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यात विनायक सावरकरांचे नाव पुढे आले.

६.                                             सावरकरांना जन्मठेप :

                           सावरकर यावेळी पॅरिसमध्ये होते. आपल्या सहकाऱ्यांना शिक्षा झाल्या असता, आपण स्वस्थ बसणे त्यांच्या क्रांतिकारी मनाला मानवेना. इंग्लंडला परतून क्रांतिकारी हालचाली कराण्याचे त्यांनी ठरवले. पण इंग्लंडमध्ये येताच त्याचा ब्रिटिश सरकारने कैद केले. जॅक्सनच्या खुनाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. हा खटला चालवण्यासाठी त्यांना हिंदुस्थानात  आणण्यात आले, मार्गात त्यांनी  बोटीवरून उडी मारून सुटून जाण्याचा विलक्षण धाडसी प्रयत्न केला. तथापि तो फसला. नाशिकात कोर्टासमोर हा खटला चालला. मार्च १९११ रोजी त्यांना ५० वर्षांची शिक्षा फर्मावण्यात आली.यावेळी त्यांचे वय फक्त २८ वर्षे होते. त्यांची शिक्षा एकताच त्यांचा जेलर उदगराला, ‘ Oh God! Fifty years” यावर सावरकरांनी शांतपणे उत्तर दिले, ‘why worry! Fifty years.Is the British rule going to survive these fifty years!’ सावरकरांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात करण्यात आली. १९२४ साली त्यांना हिंदुस्थानात आणून रत्नागिरीत त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. पुढे १९३७ साली प्रांतात कॉंग्रेसचे सरकार आल्यावर त्याची सुटका करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५३ साली सावरकरांनी अभिनव भारत संघटनेचे विसर्जन केले. ज्या घरात अभिनव भारतची सुरुवात केली होती त्याच घरात सावरकरांनी तीची स्मृतीशीला बसवली व विसर्जन केले.

**************************************************

आ.गदर पार्टी (१९१३) : लाला हरदयाळ

                            लाला हरदयाळ : लाला हरदयाळ पंजाबमधील एक अतिशय हुशार तरुण होता. इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर ते ‘इंडिया हाउस’, शामजी कृष्ण वर्मा व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपर्कात आले आणि क्रांतिकारी चळवळीत सहभागी झाले. त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून अमेरिकेची निवड केले. अमेरिकेतील भारतीय तरुणांना क्रांतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी लाला अमेरिकेला गेले. अमेरिकेतील भारतीय मजुरांची अवस्था अत्यंत दयनीय होती. कोणत्याही पारतंत्र्यातील देशातील नागरिकांना बाहेरच्या देशात मान दिला जात नाही त्याच पद्धतीने या अमेरिकेतील भारतीयांना वाईट वागणूक मिळत होती. लाल हरदयाळ यांनी अमेरिकेतील  भारतीयांना संघटीत केले.

१.                                             गदर शब्दाचा अर्थ: ‘गदर’ या शब्दाचा अर्थ विद्रोह किंवा उठाव किंवा बंड होय. याचा मुख्य उद्देश भारतात सशस्त्र क्रांती करणे हा होता .

२.                                             गदर’ वृतपत्र :

                           अमेरिकेत लाला हरदयाळ यांना भाई परमानंदपांडुरंग सदाशिव खानखोजे (मुळचे महाराष्ट्रातील वर्धा येथील) हे दोन तरुण भेटले. त्यांनी अमेरिकेतील भारतीयांना संघटीत करून त्यांच्याकडून निधी गोळा केला. त्यातून एक साप्ताहिक सुरु केले. त्याचे नाव होते ‘गदर’. क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे साप्ताहिक सुरु केले. याचे प्रकाशन उर्दू व पंजाबी भाषेत प्रकाशित होते होते.

३.                                             गदर पार्टीची स्थापना (१९१३) :

                           पुढे १९१३ साली लाला हरदयाळ यांनी सॅनफ्रान्सिस्को येथे ‘गदर’ पक्षाची स्थापना केली. लवकरच पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्याचा फायदा घेऊन भारतात उठाव करण्याची योजना या पक्षाने आखली. लवकरच संघटनेच्या सदस्यांची संख्या ५० हजार बनली व ६२ शाखा स्थापन झाल्या.

पाहिजेत....

‘भारतात बंडाचा वणवा पेटवण्यासाठी शूर सैनिक पाहिजेत.’

# पगार मृत्यू #              # निवृत्तीवेतन- स्वातंत्र्य#

# नोकरीचे ठिकाण भारत #

४.                                            गदर पक्षाची उद्दिष्टे:

‘गदर’ मधून एक ‘पाहिजेत’ अशी जाहिरात येत असे. ज्यामधून गदर पक्षाची विचारसरणी स्पष्ट होते.

*-गदर चळवळीची उद्दिष्टे

i.ब्रिटीशांच्या विरोधात सशस्त्र उठाव करणे.

ii.ब्रिटीश अधिकारांचे खून पाडणे.

iii.इंग्रजांच्या युरोपातील शत्रूंशी मैत्री करणे.

iv.बॉम्ब तयार करणे व शस्त्रे जमा करणे.

v.सरकारी यंत्रणा उलथून पाडणे.

vi.हिंदी सैन्यात बंडाची भावना तयार करणे.

५.                                            कोमागाटामारू प्रकरण :

                           ‘कोमागाटामारू’ हे एक जपानी जहाजाचे नाव भारताच्या क्रांतिकारी चळवळीच्या इतिहासात स्थान मिळवून आहे. कॅनडामध्ये १९१३ मध्ये ४००० हिंदी लोक राहत होते. तेथील सरकारने या लोकांवर अनेक बंधने घालायला सुरुवात केली, अधिक भारतीय लोक कॅनडात येऊ नयेत म्हणून सरकारने ‘कलकत्त्याहून निघालेल्या प्रवाशांनाच कॅनडात प्रवेश करू दिला जाईल’ असा जुलमी कायदा पास केला. त्यावेळी कलकत्याहून कॅनडाला जहाज सुटत नसे. त्यामुळे कॅनडाला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांची कुचंबना होऊ लागली. याचवेळी कॅनडातील बाबा गुरुदितासिंग हे राष्ट्रवादी हिंदी गृहस्थ होते. त्यांनी ‘कामगाटामारू’ नावाचे जपानी जहाज भाड्याने घेतले व ५०० हिंदी प्रवासी घेऊन हे जहाज कलकत्त्याहून कॅनडाला निघाले. हे जहाज कॅनडाच्या किनाऱ्यावर पोहोचले. पण कॅनडाच्या सरकारने या जहाजातील प्रवाशांना किनाऱ्यावर उतरू दिले नाही. एवढेच नव्हे तर या लोकांना अन्न व पाणी मिळू दिले नाही. शेवटी कॅनडाच्या सरकारने हे जहाज बुडवण्यासाठी दुसरे जहाज पाठवले त्यामुळे या जहाजास परतण्यावाचून पर्याय राहिला नाही. ब्रिटीशांनी मार्गात कुठेच या जहाजाला मदत मिळू दिली नाही. यातील लोक अन्नपाण्यावाचून मारावीत अशीच ब्रिटीशांची इच्छा होती. हे जहाज कलकत्त्यास पोहोचले तेंव्हा सरकारने प्रवाशांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातून चकमक उडाली व कित्येक लोक ठार झाले. बाबा गुरुदितासिंगही जखमी झाले. या प्रकरणामुळे भारतीयांचा प्रचंड अपमान झाला. त्यातून भारतीय लोकांची मने संतप्त झाली.

६.                                             १९१५ ची भारतात सशस्त्र उठावाची योजना :

                           रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल, गणेश पिंगळे, बागी कर्तारसिंग यांनी इंग्रज सरकारविरुद्ध सशस्त्र उठावाचा कट तयार केला. त्यासाठी बॉम्बचा कारखाना सूरु केला. २१ फेब्रुवारी हा उठावाचा दिवस ठरला. लाहोर, बनारस, मीरत, इ. ठिकाणी एकाचवेळी उठाव करण्याची योजना आखली गेली. पंजाबमधील अनेक खेड्यात हा उठाव होणार होता. २१ फेब्रुवारीला उठाव होणार होता. एवढ्यात किरपालसिंग याने फितुरी केली. त्याने सरकारला या उठावाची बातमी दिली. पोलीस यंत्रणा सावध झाली त्यांनी क्रांतिकारकांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या शस्त्रात्रे व कागदपत्रे जप्त केली.  गणेश पिंगळे, बागी कर्तारसिंग, भाई परमानंद, इ. क्रांतिकारकांचे जवळजवळ सर्वच नेते पकडले गेले. रासबिहारी बोस निसटले, कैद केलेल्या क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा झाली. फासावर जाण्यापूर्वी कर्तारसिंग यांनी जे उदगार काढले ते भारतीय माणसाला अभिमानास्पद आहेत , “जन्मठेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल. माझ्या मायभूमीस स्वतंत्र करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. मला देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक पुनर्जन्मी स्वातंत्र्यासाठी फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाही.” अशाप्रकारे १९१५ सालची भारतात सशस्त्र उठावाची गदर पार्टीशी संबंधित क्रांतीकारकांची योजना फसली.

 

इ.अनुशिलन समिती  आणि युगांतर (१९०६ )

                            १९ व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र, बंगाल व पंजाब या तीन प्रांतात सशस्त्र क्रांतिकारक उदयास आले. यावेळी लॉर्ड कर्झनचे साम्राज्यवादी धोरण व त्याने केलेली बंगालची फाळणी या कृत्यांनी सर्व बंगाल पेटून उठला होता. तरुण बंगाली माणसांचे रक्त सळसळत होते. ब्रिटीशांनी केलेल्या जुलुमाचा सूड घेण्यासाठी हे तरुण आसुसले होते. या तरुणानाच्या कृत्याला तात्त्विक बैठक देण्याचे काम क्रांतिकारक अरविंद घोष यांच्या ‘भवानी मंदिर’ या पुस्तकाने केली. या पुस्तकात क्रांतीचा ‘मास्टर प्लान’ मांडला होता.

१.                                             ‘युगांतर’ ची सुरुवात :

                           योगी अरविंद घोष, त्यांचे बंधू वीरेंद्र घोष आणि भूपेंद्र दत्त  (स्वामी विवेकानंद यांचे मुळ नाव नरेंद्र दत्त त्यांचे बंधू ) हे बंगालमधील या क्रांतीचे अग्रणी होते. त्यांनी १९०६ मध्ये ‘युगांतर’ हे क्रांतीचा प्रसार करणारे वृत्तपत्र सुरु केले. या युगांतर मधून सशस्त्र क्रांतीचा प्रसार केला. गोऱ्यांच्या दडपशाहीचा प्रतिकार हिंदी जनतेने केला पाहिजे व स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदानही केले पाहिजे, अशी क्रांतीकारकांची विचारसरणी बंगालमध्ये फैलावली. यात युगांतरचे मोठे योगदान होते.

२.                                             अनुशिलन समितीची स्थापना:

                           युगांतरने क्रांतिकारी विचारांचे वातावरण तयार करत होते त्यासोबत तरुणांचे संघटन करणे गरजेचे होते त्यासाठी १९०६ साली ‘अनुशिलन समिती’ ही संघटन स्थापन केले आणि काही वर्षातच या संघटनेचे ५०० शाखा स्थापन झाल्या. याचा या अनुशिलन समितीचे i. सरकारी अधिकाऱ्यात दहशत निर्माण करण्यासाठी व त्यांच्या अन्यायी कृत्यांना जाब विचारणे त्यांचे खून पाडणे, ii. बंगाली तरुणांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम जागृत करणे, त्यांना शस्त्राच्या वापराचे प्रशिक्षिण देणे हे उद्देश होते. त्यासाठी बंगाली तरुणांना शक्तीदेवता कालीमाता हिच्या उपासनेचे व तिच्यासाठी इंग्रजांचे रक्त सांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. एका पत्रकात बंगाली क्रांतिकारक म्हणतात, “Will the Bengali worshiper of shakti shrink from sheddin of blood? The number of Englishmen in this country is not above one lac and half and what is the number of English in each district? if you are in firm in your resolution you can in a single day bring British rule to an end. Lay down your life but first take a life” थोडक्यात सर्व हिंदी लोकांनी एकाच वेळी उठाव केला तर इंग्रजी राज्य एका दिवसात नष्ट होईल, हे क्रांतिकारकांचे प्रतिपादन सत्य असले तरी अवघड होते.

३.                                             कलेक्टर किंग्जफोर्डवर हल्ला प्रफ्फुलकुमार चाकी व खुदिराम बोस : 

                           अनुशिलन समितीतील क्रांतिकारकांनी बंगालच्या गव्हर्नरला घेऊन जाणारी रेल्वे उलथून टाकली आणि क्रांतीच्या कार्याची सुरुवात केली. कलकत्त्याचा कलेक्टर किंग्जफोर्ड हा क्रांतिकारकांचा हाडवैरी होता. त्याने शुल्लक गुन्ह्यांसाठी अनेक तरुणांना फाशीची शिक्षा दिली होती. मिरवणुकांवर अमानुष लाठीमार केला होता म्हणून खुदिराम बोस व प्रफ्फुल चाकी या क्रांतीकाराकानी त्याच्या गाडीवर बॉम्ब टाकला. पण ती गाडी केनेडी या अधिकाऱ्याची निघाली. त्यामुळे किंग्जफोर्ड बचावला प्रफुल्लचंद्रने स्वत:वर गोळी झाडून घेतली खुदिराम सापडला त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्यावेळी खुदिरामचे वय फक्त १५ वर्षे होते. त्याच्या हौतात्म्याने सारा हिंदुस्थान हळहळला, तो शाळा-कॉलेजात शिकारणाऱ्या विद्यार्थांनी त्याचे सुतक पाळले. तो हिंदी तरुणांचा ‘स्वातंत्र्यदेवता’ बनला.

४.                                            माणिकतोळा बॉम्ब प्रकरण :

                           किंग्जफोर्डवरचा बॉम्ब हल्ला देशातील पहिला बॉम्ब हल्ला होता त्याने सरकार हादरले व धरपकड करायला सुरुवात केली. अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांनी कोलकत्त्याच्या माणिकतोळा बागेत बॉम्ब तयार करण्याचा कारखाना काढला, बंगाली क्रांतिकारक उल्हास दत्त रशियाला जाऊन बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन आला होता तो या समितीच्या कामात सामील झाला. माणिकतोळा बागेत बॉम्ब, पिस्तुल व अन्य हत्यारे वापरण्याचे गुप्त प्रशिक्षण दिले जात असे. आता या कारखान्यावर पोलिसांची धाड पडली. पोलिसांना स्पोटक साहित्य सापडले. अरविंद घोष, विरेन्द्रकुमार, भूपेंद्रदत्त उल्हास दत्त, हेमचंद्र दास इ.३२ जणांना अटक झाली. खटला चालू असताना सरकारी वकील, डेप्युटी सुपरीटंड ऑफ पोलीस यांची कोर्टाच्या आवारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी क्रांतिकारकांचे प्रचंड हाल केले त्यामुळे नरेद्र गोस्वामी हा माफीचा साक्षीदार झाला. त्यालाही गोळ्या घालून ठार केले. वीरेंद्र घोष, कन्हेय्यालाल दत्त याना फाशीची शिक्षा झाली सच्छिन्द्रनाथ सन्याल इ.ना कठोर कारावासाच्या शिक्षा झाल्या. पुरावा न मिळाल्याने अरविंद घोष यांची सुटका झाली. ते सरकारच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर फ्रेंचांच्या पोंडेचेरीला गेले तिथे ते महान योगी बनले.

ई. हिंदुस्थान सोश्यालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (१९२८ )

                           पहिल्या महायुद्धात मदत केली तर आपल्या पदरी सुधारणा पडतील अशी भारतीय नेत्यांना आशा होती. महायुद्ध संपले सुधारणा तर सोडाच उलट सरकारने अधिक अन्याय करायला सुरुवात केली. ‘रौलट’ कायद्यासारखा जुलमी कायदा केला. या कायद्याचा निषेध करण्यासाठी पंजाबमध्ये जालियानवाला बाग येथे जमलेल्या निशस्त्र लोकांवर गोळीबार केला. हा गोळीबार करणाऱ्या उद्दाम जनरल डायर याला शिक्षा मिळाली नाही उलट त्याचा सन्मान करण्यात आला. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी म. गांधीनी अहिंसा व सत्याग्रहाच्या असहकार आंदोलन सुरु केले. पण ते अचानक थांबवल्याने अनेक तरुणांचा भ्रमनिराश झाला व ते क्रांतिकारी मार्गाकडे वळले.  

१.                                             हिंदुस्थान रिपब्लिकन असोसियशन(१९२४) : सचिंद्रनाथ सन्याल :

                           बंगालमधील अनुशिलन समितीतील क्रांतिकारक सच्छिन्द्रनाथ सन्याल यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या काळात त्यांनी ‘बंदीजीवन’ हा ग्रंथ लिहिला. पुढे ते गांधीजींच्या आंदोलनात सहभागी झाले पण या मार्गाने सरकार वठत नाही. म्हणून ते पुन्हा क्रांतिकारी चळवळीकडे वळले. १९२४ साली ‘Hindusthan Republican Asociation’ या संघटनेची स्थापना केली. पुढे आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सच्छिन्द्रनाथ संन्याल पंजाबला गेले ते पंजाबमध्ये आर्य समाजाच्या कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी आले होते. याच कॉलेजमध्ये भगतसिंग शिकत होता. तो स्वातंत्र्यचळवळीत काम केलेल्या अजितसिंगांशी संबंधित होता. त्यांच्या प्रभावातून भगवतीचरण, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू(महाराष्ट्र), या संगठनेत सामील झाले. क्रांतीकारकांना शस्त्रात्रे खरेदी करण्यासाठी पैश्याची गरज होती. तो कसा जमा करायचा हा प्रश्न होता. तो उभा करण्यासाठी ‘काकोरी कट’ आखण्यात आला.

२.                                             काकोरी कट’(१९२५):

                           पैसा उभारण्यासाठी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यानी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना लुटण्याची योजना आखली. त्यानुसार बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली काकोरी स्टेशनजवळ रेल्वेंवर हल्ला करून सरकारी तिजोरी पळवण्यात आली (ऑगस्ट १९२५). रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद, अश्फाकउल्ला खान हे या कटात सामील झाली सरकारला या कटाची माहिती कळाली या लुटीला ‘काकोरी कट’ म्हणून ओळखले जाते. कटातील बिस्मिल, लाहोरी, अश्फाकउल्ला यांना फाशीची शिक्षा झाली. अश्फाकउल्ला खान हा फाशीवर जाणारा पहिला मुसलमान होता. त्याला या गोष्टीचा अभिमान होता. चंद्रशेखर सरकारच्या हाती लागले नाहीत. रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी दिली त्यावळी त्यांच्या आईने विरमातेस शोभणारे उदगार काढले, ‘मातृभूमी चरणी आपले प्राण अर्पण करणाऱ्या एका स्वातंत्र्योद्ध्यास मी जन्म दिला, याचा मला मोठा अभिमान वाटतो! खरे म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या देशाचा माझ्या मुलावर अधिक अधिकार आहे. माझ्या मुला, उदात्त ध्येयासाठी तू हौतात्म्य पत्करले आहेस आणि म्हणूनच मला दु:ख करण्याचे काही कारण नाही!’

                           तर अश्फाकउल्ला फासावर जाण्यापूर्वी तो म्हणतो, ‘आमची कृत्ये बरोबर आहेत कि चुकीची आहेत यापेक्षा ती देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या उदात्त हेतूने केलेली आहेत. काही लोक आमची स्तुती करतील तर काही निंदा करतील. पण आम्ही कशाची कदर करत नाही. हिंदी स्वातंत्र्यदेवतेच्या वेदीवर बलिदान करणारा पहिला मुसलमान म्हणून मला मोठा अभिमान वाटतो.’

३.                                             ‘हिंदुस्थान सोश्यालिस्ट रिपब्लिकन असोसियाशन (HSRA)’ ची स्थापना -१९२८ : 

                           काकोरी कटामुळे क्रांतीकारी चळवळ थंडावेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. १९२८ मध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान सोश्यालीस्ट रिपब्लिकन असोसियशन’ ही संघटना स्थापन केली. ‘सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने हिंदुस्थानातील ब्रिटीश राजवट उलथवून भारतात ‘साम्यवादी प्रजासत्ताक राज्य’ स्थापन करणे’ हा या संघटनेचा उद्देश होता. या संघटनेच्या कृती गटाचे नाव ‘हिंदुस्थान सोश्यालीस्ट रिपब्लिकन आर्मी’ असे होते, चंद्रशेखर आझाद हे त्याचे सेनापती होते.

४.                                            ‘लाहोर कट’(१९३०)- लालाजींच्या हत्येचा सूड घेतला : 

                           १९२८ साली सरकारने भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी ‘सायमन कमिशन’ नियुक्त केले, त्यात एकही भारतीय सदस्य नसल्याने या कमिशनला देशभर विरोध झाला. लाहोर स्टेशनवर हि.सो.री.अ. ने आयोजीत आयोजित केलेल्या मोर्चाचे नेतृत्व लाला लजपतराय करत होते. त्यावेळी उद्दाम ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मोर्च्यावर लाठीचार्ज केला. सॉंडर्सने लालाजींच्या छातीवर लाठ्या मारल्या. लालाजी गंभीर जखमी झाले, या हल्ल्यानंतर झालेल्या सभेत लालाजी म्हणाले, ’ याच हल्ल्यानंतर लालाजींचा हल्ला मृत्यू झाला. यामुळे भारताची राष्ट्रीय अस्मिता दुखावली. या लालजींसारख्या वयोवृद्ध हिंदी नेत्याला लाठ्या माराव्या व त्या मारताच त्यांचा महिन्याभरात मृत्यू व्हावा, या प्रकाराने हिंदी तरुण क्रांतिकारकांचे रक्त खवळले. प्रसिद्ध बंगाली नेते सी.आर. दास यांच्या पत्नी वासंतीदेवी यांनी या कृत्याचा निषेध जाहीर सभेत सवाल केला, “लालाजींसारख्या आमच्या आवडत्या व वयोवृद्ध नेत्याला पाशवी इंग्रज अधिकाऱ्याने ठार करावे, हे पाहून माझे रक्त पेटते आहे. हे हिंदी तरुणांना व त्यांच्या पौरुषत्वाला आव्हान आहे. हिंदी महिलांच्या वतीने मी विचारते आहे कि, हिंदी तरुण जिवंत आहेत कि मेलेत ? तरुण पिढीपैकी असा कोणी आहे का, जो माझ्या आव्हानाचा स्वीकार करेल?” 

                           वासंतीदेवीचे आव्हान स्वीकारायचे सरदार भगतसिंग या तरुण क्रांतीकारकाने ठरविले व हिंदुस्थानचे पुत्र आजून जिवंत आहेत हे दाखवून देण्याचा निश्चय केला. सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू आणि जयगोपाल या क्रांतिकारकांनी लालाजींच्या हत्येचा सूड घेण्याचे ठरवले. १७ फेब्रुवारी १९२८ फोजी राजगुरू व भगतसिंग यांच्या पिस्तूलमधून सुटलेल्या गोळ्यांनी उद्दाम सॉंडर्सच्या डोक्याच्या चिंधड्या उडवल्या! सरकार क्रांतीकारकांना अटक करण्यात यश मिळवू शकले नाही. या घटनेनंतर लाहोर शहरात ठिकठिकाणी हिंदुस्थान सोश्यालिस्ट रिपब्लिकन पार्टी च्या नावाची पत्रके लावण्यात आलेली पोलिसांना आढळून आली. त्यात क्रांतिकारकांनी म्हंटले होते, “सॉंडर्सची हत्या म्हणजे लालाजींच्या खुनाचा सुड आहे. ३५ कोटी हिंदी लोकांच्या आदराचे स्थान असलेल्या पूज्य लालाजींच्या छातीवर सॉंडर्ससारख्या हलकट माणसाने प्रहार करावेत हि गोष्ट अत्यंत नीच आहे. हा सर्व राष्ट्राचा अपमान आहे. हिंदी राष्ट्राचा असा अपमान करून इंग्रजी सत्तेने आम्ही स्वाभिमानी व शूर भूमिपुत्रांना आव्हान दिलेले आहे. हिंदी राष्ट्र अध्यापि मेलेले नाही अथवा असला अपमान मूकपणे स्वीकारण्याइतके नादान नाही, हे आपल्या या उत्तराने आमच्या लोकांच्या व इंग्रजांच्याहि लक्षात येईल. आम्हा भारतवासीयांच्या नसानसातून तरुण रक्ताची उर्मी आहे. आम्ही भारतीय तरुण आता आमच्या राष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी उभे ठाकली आहोत. त्यासाठी जीवाची कुर्बानी करण्यास सज्ज झालो आहोत. जुलमी राज्यकर्त्यानो, सावध राहा!”

“मानवी रक्त आम्हाला सांडावे लागत आहे, याचे आम्हाला दु:ख होते आहे. पण क्रांतीच्या वेदीवर जुलमी राज्यकर्त्यांचे रक्त अर्पण करणे अपरिहार्य असते. त्यामुळेच माणसांकडून माणसांची होणारी पिळवणूक थांबणार आहे”

५.                                            कायदेमंडळात बॉम्बस्फोट :

                           एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या कायदेमंडळात सरकारच्या दडपशाहीचे public Safety Bill मंजूर होणार होते. सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतिकारकांनी सर्व ब्रिटीश साम्राज्याला हादरवून टाकणारा बॉम्बस्फोट त्या दिवशी कायदेमंडळाच्या सभागृहात केला. त्यांना कोणालाही इजा करायची नव्हती, फक्त बॉम्बस्फोट करून व नंतर स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात देऊन सर्व जगाला जाहीरपणे क्रांतीकारकांची ध्येय व उद्देश जाहीर करायचे होते. कोर्ट च्या जबान्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणार होत्या व सर्व जगाला इंग्रजी साम्राज्यवादाचे खरे स्वरूप पुन्हा एकदा दिसणार होते. जजच्या समोरील जबानीत क्रांतिकारक म्हणाले “हिदी समाज वरवर शांत दिसत असला तरी इंग्रंजाविषयी प्रचंड असंतोष आहे त्याचा केंव्हाही स्फोट होईल. या धोक्याचा कंदील दाखवण्यासाठी आम्ही हे कृत्य केले. सरकार व हिंदी नेत्यांनी डोळे व कान बंद केले आहेत. जे उघडले जावेत,यासाठी आम्ही हा बॉम्बस्फोट केला आहे.. सभागृहातील कोणची हत्या करण्याचा आमचा इरादा नाही. आम्हाला इशारा द्यायचा आहे कि क्रांतीकारकांना नष्ट करून तुम्ही राष्ट्र नष्ट करू शकणार नाही. काही व्यक्तींचा रक्तपात घडवून आणणे म्हणजे क्रांती अशी आमची कल्पना नाही. स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीही हालअपेष्टा व कोणताही त्याग करण्यास आम्ही सिद्ध आहोत, क्रांती चिरायू होवो(इन्कलाब जिंदाबाद!)

६.                                             भगतसिंग, सुखदेव, राजगुरुंना फाशी, आझादांचा मृत्यू :

                           लाहोर कटाच्या खटल्यात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, यांना लाहोर येथे २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतीकारकांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. १९३१ साली पुढील नियोजनासाठी अलाहाबादच्या अल्फेड पार्क मध्ये गुप्त बैठक होती पण फितुरीमुळे पोलिसांना याचा सुगावा लागला व पोलीस व आझाद यांच्यात गोळीबार झाला शेवटी गोळ्या संपल्यावर आझाद यांनी पोलिसांच्या हाती लागण्यापेक्षा स्वत:वर गोळी झाडून घेतली. १९४० साली लंडन येथे ओडवायर या अधिकाऱ्याचा खून केला व जालियानवालाबाग हत्याकांडाचा बदला घेतला. त्यासाठी उधमसिंगनी २० वर्षे वाट बघितली.

                           १९३० च्या दशकात क्रांतिकारी चळवळीना पुन्हा सुरुवात झाली. पण या काळातील चळवळ पूर्वीच्या चळवळीपेक्षा वेगळी होती. या दशकातील प्रमुख चळवळ हिंदुस्थान सोश्यालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या नेतृत्वाखाली चालवली गेली. हि चळवळ धर्मनिरपेक्ष होती, तसेच तिच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता आणि या काळात स्त्रियांचा क्रांतिकारी चळवळीत सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts