Wall Paper Presentation

2018-19:  WALLPAPER PRESENTATION

Wallpaper is a way of presenting information in a creative manner. On 14th January 2019, the history department of Sarda college arranged Wall Paper Presentation activity on the theme 'HISTORY THROUGH AGES'  near 50 students from all faculties were participated in the program.

अहवाल (Report)- 

14th January 2019

भित्तीचित्र प्रदर्शन (WALL PAPER PRESENTATION)

 ‘विद्यार्थी केंद्रीत शिक्षण’ या संकल्पनेनुसार अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभागी होणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेल्या बाबी अधिक समजून घ्याव्यात व समजलेल्या बाबींची मांडणी करता यावी यासाठी ‘भित्तीचित्रे’ हे एक अत्यंत महत्वाचे माध्यम आहे. असे प्रतिपादन पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या अमरजा रेखी यांनी केले. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित ‘भित्तीचित्र प्रदर्शन’ या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यामध्ये ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भित्तीचित्रे तयार केली. या भित्तीचित्रांचे प्रदर्शन महविद्यालयाच्या आवारात भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन उपप्राचार्य डॉ राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुरेखा गांगुर्डे, प्रा. कृष्णा पाटील, डॉ सत्यजित पाटील, डॉ शैलेश निकम, प्रा. एस.एस. गायकवाड, प्रा. स्वाती पवार, प्रा. ज्योती बिडलन, प्रा दया भोर उपस्थित होते. या कार्यक्रमाला हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव संजय जोशी, अनंत फडणीस, प्रबंधक अशोक असेरी यांचे प्रोत्साहन लाभले.



इतिहास विभाग प्रमुख, 
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर 
2019-20

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts