‘शिवचरित्र स्पर्धा - २०२०’
(छत्रपती शिवाजी महाराज –जीवन व कार्य यावर आधारित बहुपर्यायी
लेखी परीक्षा)
छत्रपती शिवाजी महाराजांचे
व्यक्तिमत्व कालातीत आहे. आपल्या पिढ्यांपिढ्या शिवप्रेरणेवर पोसल्या आहेत. मराठी
माणसाची अस्मिता शिवाजी महाराजाच्या इतिहासाशी जोडली आहे. तरुणांचे मन, मेंदू अन् मनगट बळकट होण्यासाठी व
निकोप मानसिकता निर्माण होण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास नीट समजणे आवश्यक
आहे. त्यासाठी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वतीने ‘शिवचरित्र स्पर्धा -२०२०’
आयोजित केली आहे.
-----------------------स्पर्धेचे
स्वरूप ----------------------------------
·
सदरची
स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची सामान्य माहिती व गोविंद पानसरे यांच्या
शिवाजी कोण होता? या पुस्तकाआधारे बहुपर्यायी लेखी परीक्षा असेल.
·
स्पर्धेसाठी
शुल्क ५० रु असून प्रत्येक स्पर्धकाला ‘शिवाजी कोण होता?’ हे गोविंद
पानसरे लिखित पुस्तक मिळणार आहे.
·
स्पर्धा
वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खुली आहे.
-----------------------पारितोषिक----------------------------------
· प्रथम तीन
क्रमाकांच्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह दिले जाईल
· स्पर्धेत
सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
----------------------- वेळ व
ठिकाण----------------------------------
·
दि. १४ फेब्रुवारी २०२०, सकाळी ९.३० वाजता
·
स्टेप्स हॉल(रु.न.११, १२)
संपर्क: डॉ सुरेखा गांगुर्डे(९८२२९८२२७८), डॉ कृष्णा पाटील,
प्रा प्रमोद तांबे, प्रा नवनाथ भोंदे
प्रा शैलेश देशमुख, रसायनशास्त्र विभाग (सायन्सच्या
विद्यार्थ्यांसाठी)
clik here for News of Shivcharitra Competition in Newspaper
अहवाल दि. १९ फेब्रुवारी २०२० शिवचरित्र स्पर्धा २०२० |
"छत्रपती शिवाजी
महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी
महाराजांना अभिवादन करतांना त्यांचे शौर्यही स्मरण केले पाहिजे. शिवचरित्र
स्पर्धेचा स्त्युत्य व अनोखा उपक्रम पेमराज सारडा महाविद्यालयाने राबविला आहे,' असे प्रतिपादन पेमराज सारडा
महाविद्यालयाचे चेअरमन अजित बोरा यांनी केले. पेमराज सारडा महाविद्यालयाच्या
इतिहास विभागाच्यावतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त अनोख्या शिवचरित्र स्पर्धा २०२०
चे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील १२० स्पर्धक विद्यार्थ्यांनी भाग
घेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य
साधून स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अजित बोरा यांच्या हस्ते रोख रक्कम व
पारितोषिक देण्यात आले. प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, उपप्राचार्य
डॉ.राजेंद्र शिंदे, प्रबंधक अशोक असेरी, प्रबंधक प्रा.मंगला भोसले, इतिहास विभागप्रमुख
प्रा.डॉ.सुरेखा गांगर्डे, प्रा.डॉ.कृष्णा पाटील, प्रा.डॉ.शैलेश देशमुख, प्रा.प्रमोद तांबे, प्रा.नवनाथ भोंदे आदी उपस्थित होते. प्रा.सुरेखा गांगर्डे यांनी
प्रास्तविकात स्पर्धेची माहिती दिली. कृष्णा पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेचा
निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम- सचिन माळी, द्वितीय- सचिन
पाखरे, तृतीय- संजय खरात व ऋतुजा देशपांडे, उत्तेजनार्थ- प्रणिता केरुळकर, प्राजक्ता ससाणे,
आकाश बडे, प्राजक्ता आघाव, राकेश पवार, मृदूला रोकडे, समृद्धी
गागरे, निकिता साळवे, गिरिष टेमकर.
इतिहास विभागप्रमुख पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर
|
|
No comments:
Post a Comment