3 January 2019: famous Poet and Prof. Shashikant Shinde on 'Work of Savitribai Phule'
‘Savitribai and Jyotiba Phule have done pioneer work for the emancipation of women. That is why in the 21st century, women have been able to free themselves from bondage and conquer all areas of progress, to breathe freely. But at the same time, women have struggling to get access to Shabarimal or Shani Mandir. This struggle is to a rethinking of feminism. It is because of such a struggle that the value of Savitribai Phule's work is underestimated and the work of the Phule couple is realized to be timeless and inspiring.' said Shashikant Shinde. He was speaking at a function organized on the occasion of Savitribai Phule Jayanti and a short term course at Pemraj Sarda College.
सावित्रीबाई फुले यांच्यावरील व्याख्यानाचा अहवाल:
सावित्रीबाई
फुलेंचे कार्य कालातीत व प्रेरणादायी- कवी प्रा. शशिकांत शिंदे
दि.
०३ जानेवारी, २०१९
‘सावित्रीबाई व
जोतिबा फुलेंनी स्त्रीमुक्तीची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच एकविसाव्या शतकात
स्त्रियांना बंधमुक्त होऊन प्रगतीची सर्व क्षेत्रे पादाक्रांत करता आली, मुक्तीचा
श्वास घेता आला. मात्र याचवेळी शबरीमाल वा शनी मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून
स्त्रियांना करावा लागत आहे. हा संघर्ष स्त्रीमुक्तीचा पुनर्विचार करावयास लावणारा
आहे. अशा संघर्षामुळेच सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचे मोल अधोरीखीत होते व फुले
दाम्पत्याचे कार्य हे कालातीत व प्रेरणादायी आहे याची जाणीव होते.’ असे प्रतिपादन
कवी प्रा. शशिकांत शिंदे यांनी केले. पेमराज सारडा महाविद्यालयात सावित्रीबाई फुले
जयंती व शॉर्ट टर्म कोर्सच्या उद्घाटन निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाईंचा
वारसा जपणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ प्रा डॉ ज्योती बीडलान यांचा पुणे विद्यापीठ
अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल, प्रा डॉ दया जेठे यांनी पी एचडी पदवी प्राप्त
केली तसेच ‘एक खोड तीन फांद्या’ हे ग्रंथ लेखन केल्याबद्दल तर प्रा डॉ माधुरी
दिक्षित यांनी शाळेला देणगी मिळवून देऊन स्त्रीशिक्षणाला मदत केल्याबद्दल सत्कार
करण्यात आला.
महाविद्यालयीन शिक्षणासोबतचे मुलीना
स्वत:च्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षणही घेता यावे यासाठी सारडा
महाविद्यालयात ब्युटी पार्लर, टेलरिंग व फोटोग्राफी या शॉर्ट टर्म कोर्सची सुरुवात
करण्यात आले. त्याचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अमरजा रेखी व
उपप्राचार्य डॉ राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हे कोर्स बाळासाहेब
पवार यांच्या जन शिक्षण संस्था या केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास
मंत्रालयाच्या मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेच्या सहयोगाने सुरु केले आहेत. या
कार्यक्रमात शफाअत सयद या कोर्सची माहिती विद्यार्थांना सांगितली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा
स्वाती रोकडे, प्रा डॉ प्रतीक्षा गंगावणे, प्रा डॉ मालुंजकर उपस्थित होते. सदर
कार्यक्रमासाठी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, अध्यक्ष शिरीष
मोडक, मानद सचिव संजय जोशी, अनंत फडणीस, प्रबंधक अशोक असेरी यांनी मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कोर्स समन्वयक सुरेखा साळवे यांनी तर सूत्रसंचालन
प्रा डॉ कृष्णा पाटील यांनी केले.
इतिहास विभागप्रमुख
पेमराज सारडा महाविद्यालय,
अहमदनगर
No comments:
Post a Comment