D.
हडप्पा
संस्कृतीतील व्यापार : |
१.
हरप्पातील व्यापार : २.
अर्थव्यवस्था म्हणजे काय? ३.
नागरीकरण म्हणजे काय? ४.
व्यापार : ५.
चलनव्यवस्था : ६.
दळणवळणाची साधने : ७.
वजनमापे: |
हडप्पा
संस्कृती ही भारतातील ‘पहिली नागरी संस्कृती’(1st
Urban Civilization) होती. सिंधू नदीच्या
खोऱ्यात हडप्पाची नागरी संस्कृती अचानक निर्माण झाली नव्हती. ती हजारो वर्षे सिधू
नदीच्या खोऱ्यातील लोकांच्या परिश्रमातून तयार झाली होती. अनेक वर्षे शिकार, पशुपालन करत भटकंती करणारा
माणूस नवाश्मयुगात सिंधू नदीच्या खोऱ्यात शेती करू लागला. या शेतकऱ्यांनी
सुरुवातीला तांबे व नंतर तांबे व जस्त एकत्र करून ब्राँझ (कास्य) या धातूचा शोध
लावला. त्याचा वापर हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी केला. त्यातून सिंधू नदीच्या
खोऱ्यात शहरे उदयास आली. या नागरी अर्थव्यवस्थेचा पाया सिंधू नदीच्या खोऱ्यातील
शेती, व्यवसाय, व व्यापार होती. त्यांचा
आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.
१.
अर्थव्यवस्था
म्हणजे काय?
·
“मानवाने अन्न, वस्त्र, निवारा, इ. मुलभूत गरजा
भागवण्यासाठी निसर्गातील साधनसंपत्तीच्या
आधारे उभ्या केलेल्या व्यवस्थेला ‘अर्थव्यवस्था’(Economy)
असे म्हणतात.”
·
शेती, व्यवसाय, व्यापार हे हडप्पाच्या
अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक होते.
२.
नागरीकरण
म्हणजे काय?
·
ज्या ठिकाणी
अकृषक(शेतीसोडून) व्यवसायातील लोकांची संख्या जास्त असते,
त्या ठिकाणाला ‘शहर’ वा ‘नगर’
म्हणतात.
·
एखाद्या
समाजाचे ग्रामीण अवस्थेकडून शहरी(नागरी) अवस्थेकडे होणाऱ्या परिवर्तनाला ‘नागरीकरण’
किंवा शहरीकरण तर इंग्रजीत त्याला Urbanaisation असे म्हणतात.
·
हडप्पा
संस्कृतीचे जे अवशेष सापडले आहेत, त्याची वैशिष्ट म्हणजेकाटकोनात छेदणारे रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, दिवाबत्तीची सोय, घरांची नियोजनबध्द रचना, पक्के रस्ते, कचराकुंडीची सोय, इ. च्या आधारे ही सर्व
नगरे(शहरे) आहेत. भारताच्या इतिहासातील ही पहिले शहरे आहेत. म्हणून हडप्पा
संस्कृतीला ‘भारतातील पहिली नागरी संस्कृती’ म्हणतात.
हडप्पा
संस्कृतीच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रमुख आधार व्यापार होता. अंतर्गत व परराष्ट्र
असा दोन्ही प्रकारचा व्यापार चालत असे.
३.अंतर्गत व्यापार:
हरप्पा
संस्कृतीत सिंधू व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात चालणाऱ्या व्यापार हा अंतर्गत
व्यापार होता. शेती व व्यवसाय हे अंतर्गत व परराष्ट्र व्यापाराची पायाभरणी करणारे
घटक होते.
३.१:
व्यापाराचा प्रमुख आधार : शेती व व्यवसाय :
शेतीतील उत्पादने हा अंतर्गत व परराष्ट्र व्यापाराचा प्रमुख
आधार असावा. ‘शेती’ हा हडप्पा संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.
शेती हा ‘कणा’ हडप्पाच्या अर्थव्यवस्थेचा होता. इथल्या शहरांची
खाद्यपदार्थांची गरज शेतीच्या माध्यमातून भागवली जात होती. सुपीक जमीन व बारमाही
पाणी यामुळे शेती समृद्ध होती. सिंधूवासीय गव्हू,
तांदूळ, जव, वाटाणा, कापूस, विविध फळे, तेलबिया, यांचे उत्पादन घेत असत. याच कृषी मालाची देवाण-घेवाण हा
अंतर्गत व्यापाराचा मोठा हिस्सा असावा. गुजराथमधून पंजाबला तांदूळ आयात केला जात
असावा. तर लोथल वरून मोहेंजोदडो, हडप्पा, बनवली या शहरांमध्ये कापसाची आयात केली जात असावी. एकंदर
शेतीने व्यापाराचा पाया भक्कम करण्याचे काम केले.
अंतर्गत
व परराष्ट्र व्यापारात सिंधू खोऱ्यात राहणाऱ्या विविध व्यावसायिकांनी बनवलेल्या
वस्तूंचा मोठा वाटा असावा. कापड बनवणे, विटा बनवणे, भांडी बनवणे, धातुकाम, मणी बनवणे, अलंकार बनवणे, खेळणी बनवणे हे प्रमुख व्यवसाय होते. जगात सर्वप्रथम
कापूस हडप्पा संस्कृतीतील सिंधू नदीच्या खोऱ्यातील लोकांनी पिकवला त्यामुळे
कापसाला ग्रीक ‘सिंदोन’(सिंधू या नावावरून) म्हणत. सुती कापडाच वापर जगात
प्रथम या लोकांनी केला. जगात सर्वप्रथम भाजलेल्या विटांचा वापर हडप्पा
संस्कृतीत झाला. हडप्पा शहरातील जवळ-जवळ सर्व इमारती विटांच्या आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणावर विटा वापरल्या आहेत याचा अर्थ विटा तयार करणे हा एक मोठा
व्यवसाय असावा. या वस्तूंची देवाण-घेवाण
हा अंतर्गत व परराष्ट्र व्यापाराचा मोठा हिस्सा होता.
४.परराष्ट्र व्यापार:
हडप्पा
संस्कृतीतील शहरांचा आर्थिक आधार हा अंतर्गत व्यापाराबरोबरचा विदेशी किंवा
परराष्ट्र व्यापार होता. याचा पुरावा म्हणजे,
·
पश्चिम
आशियातील सुमेरियन व इतिप्तशियन संस्कृतीत उत्खननात सापडलेले हडप्पातील शिक्के
किंवा मुद्रा (seals),
·
तसेच लोथल, सूरकोटडा आणि बालाकोट ही
हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे समुद्रकाठी असलेली बंदरे होती. या बंदरातून मध्य
आशियातील सुमेरिया, इजिप्त
इ. देशातील तत्कालीन संस्कृतींशी व्यापार चालत असावा.
·
उत्खननातील
अवशेषातून हडप्पा संस्कृतीत जी भौतिक समृद्धी(श्रीमंती) दिसते ती परकीय
व्यापारातून आलेली असावी.
यावरून
हडप्पाच्या अर्थव्यवस्थेत असणारे व्यापाराचे महत्व लक्षात येते.
४.१ :शिक्के किंवा मुद्रा (seals)–परकीय व्यापाराचा पुरावा
हडप्पा
संस्कृतीतील काही वस्तू व शिक्के(seals) इजिप्तशियन व सुमेरियन(बेबोलोनियन) संस्कृतीत सापडतात. तसेच
इजिप्तशियन व सुमेरियन संस्कृतीतील काही वस्तू व शिक्के हडप्पा संस्कृतीत सापडतात. विशेषत: हडप्पा
संस्कृतीतील दोन डझन शिक्के सुमेरियात सापडले आहेत. तर सद्याच्या गुजराथमधील
हडप्पा संस्कृतीतील लोथल या शहरात गोल बटणाच्या आकाराचे अनेक शिक्के सापडले आहेत
जे पश्चिम आशियातील देशातील होते. यावरून हडप्पा संस्कृतीतील व्यापाऱ्यांचा पश्चिम
आशियातील सुमेरिय(बॅबिलोनिया), इजिप्त या देशांशी परदेशी व्यापार होता.
४.२ :मौल्यवान धातू व खड्यांची आयात :
सोने
: हडप्पा संस्कृतीत कर्नाटकातील
सोन्याच्या खाणीतून सोने आयात करत असावेत. कारण कर्नाटकातील सोन्याच्या खाणींच्या
शेजारी नवाश्मयुगीन वस्त्या सापडल्या आहेत त्यावरून या सोने आयातीचा अंदाज येतो.
चांदी
: अफगाणिस्तान व इराण मधून चांदीची
आयात करत असावेत.
तांबे
: तांब्याची आयात राजस्थानातील खेत्री
येथील तांब्याच्या खाणीतून आणत असावेत. खेत्री येथील खाणी या भारतातील सर्वात
जुन्या खाणी आहेत.
शिसे
: शिस्याच्या आयात दक्षिण भारतातून
करत असावेत.
याशिवाय, नीलम रत्न हे
अफगाणिस्तानमधून , अभ्रक
इराण व कर्नाटकमधून, नीलमणी
महाराष्ट्र, गोमेद
रत्न सौराष्ट्र मधून, हिरवेमणी
मध्यआशियातून आयात करत असावेत.
एकूणच, परराष्ट्र व्यापारात सोने, चांदी, अलंकार, भांडी, धातूच्या वस्तू, इ.ची आयात-निर्यात होत
होती.
५. दळणवळणाची साधने :
अंतर्गत
व परराष्ट्र व्यापार हा भूमार्गे व जलमार्गे असा दोन्ही मार्गांनी चालत असावा.
भूमार्गे चालणाऱ्या परकीय व्यापारात बैल, बैलगाड्या, गाढव इ. माध्यमातून मालाची ने-आण करत असावेत. जलमार्गे
चालणाऱ्या व्यापारासाठी प्रामुख्याने
जहाजांचा प्रामुख्याने वापर होत असावा. ‘लोथल’(सद्याचे गुजरात) येथे
‘जहाजाची गोदी’ (डॉकयार्ड) सापडली. याठिकाणी जहाजांची बांधणी, दुरुस्ती होत असावी. तसेच
मातीच्या भांड्यावर जहाजाची चित्रे कोरली आहेत. लहान मुलांच्या खेळण्यातही
जहाजांची खेळणी आहेत. हे जलमार्गे परराष्ट्र व्यापाराचे पुरावे आहेत. यावरून
दळणवळणाच्या साधनांचा अंदाज येतो.
६. चलनव्यवस्था :
हडप्पा
संस्कृतीत सापडणाऱ्या शिक्क्यांवरून कोणत्या प्रकारची चलनव्यवस्था अस्तित्वात होती
याचा अंदाज येतो. कोणत्याही नाण्याचे अवशेष सापडले नाहीत. वस्तूविनिमय पद्धती रूढ
असावी.
७. वजनमापे:
समान आकाराचे व वजनाचे काही दगडी गोळे सापडतात. त्यांचा उपयोग
वजन म्हणून करत असावेत. १६ भागात विभागली गेलेली धातूची पट्टी सापडली आहे. तिचा
उपयोग मोजपट्टी म्हणून करत असावेत. या संस्कृतीत मोजमाप सोळाच्या पटीत केले जात
होते. उदा. १६, ३२, ४८, ६४, १२८, २५६, ५१२. भारतात १६च्या पटीत
अंक मोजण्याची पद्धती अलीकडच्या काळापर्यंत रूढ होती. रुपयाला १६ आणे म्हणत असत
No comments:
Post a Comment