Tuesday, 27 April 2021

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज

समाजाच्या इतिहासाची जपणूक करणारा 'हेळवी समाज' व्हिडिओ पाहण्याासाठी या निळ्या अक्षरावर क्लीक करा
epaper08:48 PM Jan 27, 2021 | सामना ऑनलाईन
      
 प्रणव पाटील 
दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरात कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळव्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला.

हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदीबैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी. त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय. कारण मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हिंदुस्थानच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे अलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांकडे आले.

हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भलेथोरले जनावर. नंदीबैलाचे आकर्षण थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे. अंगापिंडाने मजबूत असणारा पांढराशुभ्र नंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. हेळव्यांचा पोषाखही तसाच लक्षवेधी आहे. डोक्याला लाल, गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे (हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता.), हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात. नंदीबैलावर रंगीत चित्रांची काशिदीकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात. गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा. हेळवी बैलावर बसून गावात आले, की हां हां म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळते. गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात. हेळवीदेखील गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात.

हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात. ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा जलद असतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही. साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट; त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे. प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मुळाचा मूळपुरुष, मूळगाव सांगतात. एखादे वूâळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का व कसे आले ते सांगतात. यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते. पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात. वंशावळीतील नावे मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते. हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते; परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते. एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात. लग्न, मुलाचा जन्म या नोंदींमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात.

पूर्वी, हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाNयांना गुरू म्हणतात.
मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळजवळ संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी ती काही प्रमाणात चालू आहे. पूर्वी त्यांचे वेंâद्र कासेगाव, जि. सांगली हे होते. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे वेंâद्र बेळगाव (कर्नाटक) हे असून मूळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर; परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वज्र्य आहे; महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा पवित्रवार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात. ते सोमवारी बैलावर बसत नाहीत. हेळवी लोक त्यांचे आडनाव ‘हेळवी’ असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते, तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते. दक्षिण महाराष्ट्रात हेळवी परंपरा भक्कम लोकाश्रयामुळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे ती इतरत्र तशीच चालू राहावी याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझ्या वंशावळीच्या शोधात मी अनेकदा हेळव्यांकडे गेलो. त्यांनी माझा प्रेमाने पाहुणचार केला व माहिती पुरवली, त्याबद्दल मी मायप्पा हेळवी व बाबू हेळवी यांचा आभारी आहे.

हेळवी समाजाच्या काही समस्या –
– शालेय शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या सततच्या भटकंतीमुळे नगण्य आहे.र्
– त्यांना जातींच्या सरकारी सवलती व योजना यांची माहिती नाही.र्
– हेळवी समाज कर्नाटकात संघटित आहे; परंतु महाराष्ट्रात तो संघटित नाही.र्
– काही गावांचे हेळवी अकाली गेल्यामुळे त्या गावी दुसऱ्या हेळव्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.र्
– हेळवी परंपरा सांभाळण्यासाठी मुलगाच हवा या धारणेमुळे त्यांच्यात अपत्यांचा जन्मदर अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन करणे गरजेचे आहे.र्
– महाराष्ट्रात काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येतात आणि वंशावळीची नोंद ठेवतात, काही ठिकाणी त्यांचे येणे बंद झाले आहे. तेथे हेळव्यांची नेमणूक व्हावी.
– हेळव्यांना कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे


Wednesday, 21 April 2021

Link for free journals for research

 Dear All,

For researchers, academicians, students and knowledge seekers, here are 20 open access journals which may be of your interest. 


1.  Taylor & Francis 

https://www.tandfonline.com/openaccess 

2.  ELSEVIER 

https://www.elsevier.com/about/open-science/open-access/open-access-journals 

3.  WILEY 

https://authorservices.wiley.com/open-research/open-access/index.html 

4.  SPRINGER 

https://www.springeropen.com/ 

5.  SCIENCE OPEN 

https://www.scienceopen.com/ 

6.  SCIENCE DIRECT 

https://www.sciencedirect.com/browse/journals-and-books 

7.  JSTOR

https://about.jstor.org/oa-and-free/ 

8.  (OAL) OPEN ACCESS LIBRARY 

http://www.oalib.com 

9.  OXFORD ACADEMIC 

https://academic.oup.com/journals/pages/open_access  

10.  LUND UNIVERSITY LIBRARIES 

https://www.lub.lu.se/en/services-support/publishing-registering/open-access 

11.  KARGER

https://www.karger.com/OpenAccess 

12.  THIEME OPEN 

https://open.thieme.com/web/19/home 

13.  OMNICS OPEN ACCESS

https://www.omicsonline.org/ 

14.  BMC

https://www.biomedcentral.com/  

15.  MDPI 

https://www.mdpi.com/about/journals 

16.  COGENT OA 

https://www.cogentoa.com/ 

17.  OPEN ACCESS

https://www.omicsonline.org   

18.  ERUDIT 

https://www.erudit.org/en/  

19.  HIGHWIRE  

https://www.highwirepress.com/ 

20.  DIRECTORY OF OPEN SCIENCE ARTICLES

https://www.doaj.org/ 


Hope these journals may be of your help to carry out your research work.

Monday, 19 April 2021

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021 निमित्त प्रश्न मंजूषा स्पर्धा Quiz Competition on the occasion of Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2021

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगरच्या वतीने बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित *बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२१* आयोजित केली आहे.

 ही स्पर्धा निशुल्क आहे. 

पहिल्या १०० सहभागी विद्यार्थ्यांना ई सर्टिफिकेट त्यांच्या मेलवर येईल. 


त्यासाठी इमेल आयडी व्यवस्थित टाका.


 सर्टिफिकेट न आल्यास उद्या पुन्हा प्रयत्न करा किंवा आम्ही दुसरी लिंक पाठवू.

प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा, 

आयोजक:
डॉ सुरेखा गांगुर्डे, इतिहास विभाग प्रमुख
डॉ कृष्णा पाटील


Sunday, 28 March 2021

'झुंज नियतीशी' या शिवचरित्राच्या लेखिका मेधा कुलकर्णी यांची प्रसाद बेडेकर सर यांनी घेतलेली मुलाखत


 शिवाजी महाराजांचे एक आगळे-वेगळे चरित्र मूळच्या नगरच्या असलेल्या लेखिका मेधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे. त्यांनी इतिहास आणि साहित्य यांची सांगड घालून 'challenging Destiny' या नावाने इंग्रजीत व 'झुंज नियतीशी' या नावाने मराठीत लिहले आहे. या पुस्तकाचा व लेखिकेचा परिचय नगरचे प्रसिद्ध मुलाखतकार प्रसाद बेडेकर यांनी लेखिकेची मुलाखत घेऊन करून दिला आहे. ती मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.https://youtu.be/QXizqscVzm4


Saturday, 13 March 2021

शेतकऱ्यांनी सावकारांची नाक का छाटली? हा दै लोकसत्ता मधील डॉ श्रद्धा कुंभोजकर यांचा लेख

शेतकऱ्यांनी सावकारांची नाक का छाटली? डॉ श्रद्धा कुंभोजकर,

 दै लोकसत्ता

श्रद्धा कुंभोजकर

१९ व्या शतकात- सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी आर्थिक पिळवणूक करणारे सावकार आणि इंग्रज सरकार यांच्या निरंकुश सत्तेला आव्हान देण्याची हिंमत केली होती. त्यास जोडून झालेल्या अनेक उद्रेकांना मिळून दख्खनचे दंगे किंवा खतफोडीचे बंड म्हणून ओळखले जाते. पुढे २० व्या शतकातही- मुळशी सत्याग्रह तसेच खोतीप्रथेविरुद्धच्या लढय़ाच्या रूपाने शेतकऱ्यांनी अन्यायाविरोधात उभे ठाकण्याची संघर्षवृत्ती दाखवली; आणि ती आता २१ व्या शतकात दिल्लीच्या वेशींवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांतही दिसते आहेच.. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांतला हा सातत्यपूर्ण संवाद उलगडून दाखविणारा लेख..

Monday, 22 February 2021

शिव चरित्रातून काय धडा घ्याल? - डॉ कृष्णा पाटील

शिव चरित्रातून काय धडा घ्याल? - डॉ कृष्णा पाटील 
आज शिवजयंती आहे. नक्कीच उत्साहात साजरी केली पाहिजे मात्र त्याच वेळी शिवचरित्रातून विद्यार्थी, व्यक्ती, समाज आणि राज्यकर्ते काय धडा घेऊ शकतील याचा विचार झाला पाहिजे.

भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासात ५० हजार पेक्षा जास्त राजे होऊन गेले, पण या सर्वांच्या जयंती आपण साजरे करत नाही, इतकेच काय या राजांचे वंशजही त्यांची आठवण काढत नसतील, त्यांच्या समाध्यावर वर्षानुवर्षे कोणी साधी पणतीही लावत नसेल. मग अशा स्थितीत शिवाजी महाराजांच्या हयातीत व मृत्युनंतरही इतके लोकप्रेम का भेटतय, शिवजयंती एवढ्या मोठ्या उत्साहात आपण का साजरी करत आहोत याचे चिंतन होणे आवश्यक आहे.

आणि हो, शिवजयंतीच्या उत्साहात आपल्याला शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचा विसर पडू नये म्हणून मला ‘शिव चरित्रातून समाजातील प्रत्येक घटकांनी काय धडा घ्यावा’ यावर विचार करावा वाटला तोच मी तुमच्यासमोर मांडत आहे.

पहिला प्रश्न शिवाजी महाराजांकडून राज्यकर्त्यांनी काय धडा घ्यावा?

भारतातील दोन राजांची मी उदाहरणे देतो,
एक होता हैद्राबादचा निजाम ज्याच्या टेबलवर पेपरवेट म्हणून जो दगड ठेवला होता... तो आठ कोठीचा हिरा होता.....राजा श्रीमंत होता म्हणून तो आठ कोटीचा हिरा टेबलावरचे पेपर उडू नयेत म्हणून ठेऊ शकला मात्र हा पैसा आला कुठून ... प्रजेकडून, प्रजेला त्रास देऊन ....आणि त्याचा वापर मात्र स्वत:च्या शौकासाठी... हे योग्य आहे का? 

दुसरा जुनागढचा नवाब ज्यांन आपल्या लाडक्या कुत्र्याच लग्न लावण्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले ....हा प्रजेचा पैसा त्याने आपल्या फालतू छंदावर खर्च केला.. यातून प्रजेला काय फायदा झाला.. निश्चितच काही नाही. 

अशा राजांच त्यांच्या प्रजेने स्मरण का कराव ज्यांनी लोकांच्या कल्याणाची काळजी केली नाही. राज्याचा वापर स्वत:साठी केला. 

राज्य का कराव ? असा प्रश्न यांना पडला असेल तर त्यांनी स्वत:ची तुंबडी भरायला असा सरळ अर्थ लावला...

या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज का राज्य करत होते? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास ..त्यांच्या राजमुद्रेत व त्यांच्या कार्यात त्याच उत्तर आपल्याला सापडत.... महाराजांच्या राजमुद्रेच्या शेवटच्या ओळी आहेत.... ‘मुद्रा भद्राय राज्यते’ याचा अर्थ होतो... ही  मुद्रा लोक कल्याणासाठी कार्यरत आहे. म्हणजे शिवाजी महाराज जे राज्य करत होते. ते इथल्या रयतेसाठी, प्रजेसाठी, लोकांसाठी होय.. म्हणून तर त्यांच्या प्रत्येक निर्णयात, लढ्यात त्याचा प्रतिबिंब उमटत....

शिवाजी महाराजांनी १६७३ साली आपल्या सैन्याला उद्देशून एक जाहीरनामा काढला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे  ‘रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका’....’सैन्यातील घोड्यांना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी करा’.... साहजिकच रयतेला जराही त्रास देऊ नका अशी महाराजांची आज्ञा होती. ते पुढे  म्हणतात.. तुम्ही जर रयतेस त्रास दिलात तर रयत म्हणेल, .... ‘मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही’... थोडक्यात मोगल व स्वराज्याचे सैन्य यात फरक काय असा प्रश्न रयत विचारेल. म्हणून रयतेला काडीचाही त्रास होईल असे वर्तन करू नका अशी महाराजांची सक्त ताकीद होती. यामुळेच शिवाजी महाराजांचे राज्य खऱ्या अर्थाने ‘रयतेचे राज्य’ म्हणून ‘स्वराज्य’ होते. लोकांना ते आपले राज्य वाटत होते.

नुकतच इशा अंबानीचा लग्न झाल, त्यात अमिताभ बच्चन वाढपी होता, शाहरुख ते सर्व बॉलीवूड वरातीत नाचले, या लग्नात ७३२ कोटी रुपये खर्च झाले,

चार ते पाच वर्षापूर्वी अजीज प्रेमजी यांच्या मुलाच लग्न झाल या लग्नात ‘आपली उपस्थिती हाच आहेर’ अशी टीप छापली होती. जर आहेर द्यायचीच इच्छा असेल तर रोख रक्कम द्या ती सामाजिक कार्याला देणगी म्हणून दिली जाईल अशी आणखी एक टीपही छापली होती. लग्न एकदम साधेपणे पार पडले. २० कोटी रुपये जमा झाले ते २०० शाळांच्या डिजिटलायजेशन साठी वापरण्यात आले.

यातील कोणत लग्न भारी अस तुम्हाला वाटत?
नक्कीच दुसर ज्यातून लोकांच कल्याण साधल...
तशी राज्य करण्याची संधी अनेक राजांना मिळाली मात्र ते राज्य लोकांच्या कल्याणसाठी राबवल ते शिवाजी महाराजांनी...

म्हणून आजच्या राज्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देटाला हात लावू नका असा आदेश दिला होता. त्यांचा वारसा सांगणारे आपण देटासहित तर भाजी खात नाही न!, आपल्याला मिळालेली सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी वापरत आहोत न का स्वत:च्या. हे ध्यानात घेऊन राज्य केले पाहिजे 

सोबत शिवाजी महाराजांची धर्मसहिष्णुता, स्त्रीयांप्रती आदरभाव, अठरापगड जातीच्या मदतीने स्वराज्याची उभारणी, आरमाराची उभारणी, व्यापारास प्रोत्साहन, प्रजेच्या रक्षणासाठी केलेली किल्ल्यांची उभारणी याचाही वसा व वारसा आजच्या राजकर्त्यांनी घ्यावा.

शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यावा ?

शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ‘स्वराज्य’ स्वप्न पहिले आपले ध्येय निश्चित केले. तस तुम्हीही तुमच ध्येय निश्चित करा... ध्येयाशिवाय जगणं हे जगणंच नसत अस मला वाटत

स्वराज्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी महाराजांनी अखंड व प्रचंड मेहनत घेतली. तशी तुम्हीही तुमच ध्येय प्राप्त करण्यासाठी अहोरात्र तन, मन, धन अर्पण करून मेहनत घ्या.. ध्येय प्राप्ती होईपर्यंत कष्ट थांबवू नका..

शिवाजी महाराजांकडून नियोजन शिका, आत्मविश्वासाच बाळकडू घ्या ....

आणि ज्या दिवशी तुमच ध्येय सिद्ध होईल तीच शिवाजी महाराजांना जयंतीची तुमच्याकडून दिलेली सर्वोत्कृष्ट शुभेच्छा ठरेल... असा धडा शिवचरित्रातून घ्या.
धन्यवाद!

Thursday, 28 January 2021

नवे आर्थिक धोरण (The New Economic Policy - NEP)* मराठी विश्वकोश नोंद

*नवे आर्थिक धोरण (The New Economic Policy - NEP)* 
नवे आर्थिक धोरण : (१९२१–२८). आधुनिक रशियाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे धोरण. मार्क्सवादी विचारवंत न्यिकलाय लेनिनच्या (१८७०–१९२४) नेतृत्वाखाली रशियात जगातील पहिली ‘साम्यवादी क्रांती’ झाली (नोव्हेंबर १९१७)....... 
 - कृष्णा पाटील 
 
 पूर्ण लेखाची लिंक : https://marathivishwakosh.org/40462

मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीचा प्रचार व प्रसार करून जिज्ञासू वाचकांना, संशोधकांना, अभ्यासकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व माहिती उपलब्ध करून देणे हा मराठी विश्वकोशाचा प्रधान हेतू आहे. अभ्यासपूर्ण मराठी लेख, सर्च, मोबाइलवर अभिप्राय, नोटीफिकेशन आणि बरेच काही. आजच डाऊनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=io.marathi.vishwakosh

Friday, 22 January 2021

भारताचा नकाशा बनवण्याच्या कार्याचे मोल -प्रदीप आपटे यांचा लोकसत्ता मधील लेख

 भारताचा नकाशा बनवण्याच्या कार्याचे मोल -प्रदीप आपटे यांचा लोकसत्ता मधील लेख लेख वाचण्यासाठी निळ्या  अक्षरांवर क्लिक करा 

सर्वेक्षण जिथे चाले तो भाग हवामानाने गरम आणि दमट. त्यामुळे अतोनात थकवा येई. अस्वच्छ पाणी, मिळेल तसे अन्न यामुळे शारीरिक व्याधी जडत. काही प्रदेश तर इतके खडतर असायचे की तिथे कामाला धाडणे म्हणजे मृत्युदंड समजला जाई! त्यावर कडी म्हणजे सर्वेक्षण करणाऱ्यांना लुटारू लुबाडायचे आणि मारहाण करायचे. खेरीज हिंस्र श्वापदांचे हल्ले होत असत. सहकाऱ्यांवर लुटारूंनी केलेल्या हल्ल्याला तोंड देताना रेनेल जायबंदी झाला होता. खेरीज एका बिबटय़ाने बरोबरच्या पाच जणांना घायाळ केल्यावर आपल्या संगिनीने त्या बिबटय़ाला रेनेलने मारले होते.

शिवचरित्र स्पर्धा २०२०

शिवचरित्र स्पर्धा २०२० 

चौथे शिवाजी महाराज

"मी स्वतंत्र आहे. मला स्वातंत्र्य पाहिजे. मी ब्रिटिशांचा  गुलाम नाही. मी  प्रिन्स ऑफ वेल्सपेक्षा तीळभर कमी  नाही. छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे असतात,"  असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत, ब्रिटिशांविरुद्ध एकाकी लढा  देत अवघ्या वीस वर्षांच्या राजांनी प्राणार्पण केले ते राजे , ते वीर हुतात्मा म्हणजेच 'कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज'.
   क्रांतिकारी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृतीदिन
ब्रिटिशांशी संघर्ष करताना छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले होते. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्याचे पडसाद नंतर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही उमटले. कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून तेव्हाचे दिवाण व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोल्हापूरातून अन्यत्र हलवले. जून १८८२ मध्ये महाराजांना अहमदनगरच्या किल्ल्यात एकांतवासात ठेवण्यात आले. त्यांना कोणाला भेटू दिले जात नव्हते. शेवटचे दीड वर्ष महाराज किल्ल्यात होते. २५ डिसेंबर १८८३ रोजी ब्रिटीश सार्जंट ग्रीन याच्याशी झालेल्या झटापटीत महाराजांच्या पोटाला मार लागून मृत्यू झाला. नाताळच्या दिवशीच ब्रिटीशांकडून महाराजांची हत्या झाली. महाराज तेव्हा अवघ्या २० वर्षांचे होते. आपला राजा ब्रिटीशांकडून मारला गेला, हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच शहराबाहेर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.
 २५ डिसेंबर १८८३ रोजी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात छत्रपतींच रक्त सांडले आपल्या प्राणाची आहुती देऊन महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बलिदान दिले.अशा या क्रांतीवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या १३७ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

Sunday, 1 November 2020

सद्या सुरू असलेल्या अमेरिकेतील निवडणुका समजून घेण्यासाठी लोकसत्ता चे संपादक गिरीश कुबेर यांचा लेख

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कधी व्हावी हे साधारण पावणेदोनशे वर्षांपूर्वी ठरले, तसेच सातत्य अमेरिकेच्या भारतविषयक धोरणांतही गेल्या काही काळात दिसले आहे. तेव्हा यंदाच्या अमेरिकी निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्यांपैकी भारताच्या बाजूने कोण, याआधारे एखाद्याची बाजू घेण्यात अर्थ नाही. चर्चाच करायची तर बाकीचे मुद्दे आहेत आणि ते अधिकच विचारात- किंवा चिंतेत-  पाडणारे आहेत..अमेरिकेतील निवडणूक समजून घेण्यासाठी

Saturday, 31 October 2020

Important links

 Savitribai Phule Pune University

दारा शिकोव्ह

दारा शिकोव्ह दारा शुकोह हा औरंगजेबचा मोठा भाऊ. पण सत्तासंघर्षांत यशस्वी होऊन औरंगजेब मुघलसम्राट झाला. त्याऐवजी दारा शुकोह बादशहा झाला असता तर.. या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आधी, दारा शुकोह नेमका कसा होता, हे माहीत हवे. हे पुस्तक ते विपुल संदर्भानिशी सांगते.

Featured Post

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

  🌟 इतिहास विषय P ractical प्रॅक्टिकल  - परीक्षेचे स्वरूप :•    •             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical / प्...

Popular Posts