Friday 22 January 2021

चौथे शिवाजी महाराज

"मी स्वतंत्र आहे. मला स्वातंत्र्य पाहिजे. मी ब्रिटिशांचा  गुलाम नाही. मी  प्रिन्स ऑफ वेल्सपेक्षा तीळभर कमी  नाही. छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे असतात,"  असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत, ब्रिटिशांविरुद्ध एकाकी लढा  देत अवघ्या वीस वर्षांच्या राजांनी प्राणार्पण केले ते राजे , ते वीर हुतात्मा म्हणजेच 'कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज'.
   क्रांतिकारी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृतीदिन
ब्रिटिशांशी संघर्ष करताना छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले होते. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्याचे पडसाद नंतर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही उमटले. कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून तेव्हाचे दिवाण व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोल्हापूरातून अन्यत्र हलवले. जून १८८२ मध्ये महाराजांना अहमदनगरच्या किल्ल्यात एकांतवासात ठेवण्यात आले. त्यांना कोणाला भेटू दिले जात नव्हते. शेवटचे दीड वर्ष महाराज किल्ल्यात होते. २५ डिसेंबर १८८३ रोजी ब्रिटीश सार्जंट ग्रीन याच्याशी झालेल्या झटापटीत महाराजांच्या पोटाला मार लागून मृत्यू झाला. नाताळच्या दिवशीच ब्रिटीशांकडून महाराजांची हत्या झाली. महाराज तेव्हा अवघ्या २० वर्षांचे होते. आपला राजा ब्रिटीशांकडून मारला गेला, हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच शहराबाहेर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.
 २५ डिसेंबर १८८३ रोजी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात छत्रपतींच रक्त सांडले आपल्या प्राणाची आहुती देऊन महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बलिदान दिले.अशा या क्रांतीवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या १३७ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts