युनिट 2 :
हरप्पा संस्कृती ( ब्राँझ युगीन संस्कृती)
A : हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार
अ.
या संस्कृतीला नाव कसे दिले? :
‘सिंधू संस्कृती’:
संस्कृतीला नाव देण्याच्या एका पद्धतीनुसार या संस्कृतीचे
अवशेष सिंधु नदीच्या खोऱ्यात सापडले. सुरुवातीच्या काळात ही संस्कृती सिंधू
नदीच्या खोऱ्यापुरती मर्यादित असावी असे संशोधकांना वाटले त्यामुळे या संस्कृतीला
‘सिंधू संस्कृती’ असे म्हणतात.
‘हडप्पा संस्कृती’ : ही संस्कृती सिंधू नदीच्या
खोऱ्याशिवाय भारताच्या मोठ्या भूभागावर आढळून आली. त्यामुळे संस्कृतीचे अवशेष ज्या
ठिकाणी सर्वप्रथम सापडले. त्या ‘हडप्पा’ या ठिकाणाचे नाव या संस्कृतीला दिले.
त्यानुसार या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असेही म्हणतात.
आ.
सिंधू
संस्कृतीचा शोध कोणी व कसा लावला?:
ब्रिटिश
राजवटीत भारतात रेल्वेचे रूळ टाकण्याचे काम सुरु होते. अशाच पद्धतीने
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रूळ टाकत असताना काही विशिष्ट आकाराच्या विटा
सापडल्या. त्यावरून भारत सरकारच्या पुरातत्व खात्याने येथे एखादी प्राचीन संस्कृती
गाडली असावी असा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार हरप्पा या गावाजवळ एका शहराचे अवशेष
सापडले. त्याला हडप्पा असे नाव देण्यात आले. हडप्पा शहराचा शोध दयाराम
सहानी यांनी १९२१ मध्ये लावला. तर ‘मृतांची टेकडी’ म्हणजे ‘मोहेजोदारो’
या शहराचा शोध राखालदास बॅनर्जी यांनी १९२३ साली लावला. भारत
सरकारच्या त्या काळातील पुरातत्व खात्याचे प्रमुख जॉन मार्शल यांनी १९२४
मध्ये लंडनमधील वर्तमानपत्रात या संशोधनाला प्रसिद्धी दिली. व जगापुढे ‘सिंधू’
किंवा ‘हडप्पा’ संस्कृती आली.
इ.
हडप्पा संस्कृतीची व्याप्ती केवढी आहे?
हडप्पा संस्कृतीचे अवशेष सुरुवातीला सिंधू नदीच्या खोऱ्यात
सापडले. त्यामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, सुरकोतडा, इ. ठिकाणांचा समावेश होता. पुढे लोथल,
कालीबंगन, धोलाविरा, रूपड, इ. ठिकाणीही शहरांचे अवशेष सापडले. जवळ जवळ१५०० ठिकाणी उत्खनन
झाले आहे. त्यातील १५० ठिकाणी शहरांचे अवशेष सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीचा
विस्तार उत्तरेला मांडा(जम्मू-काश्मीर) ते दक्षिणेला दायमाबाद(महाराष्ट्र), तर पूर्वेला
आलमगीर (उत्तर प्रदेश) ते पश्चिमेला मकरान(बलुचिस्थान) च्या दरम्यान आहे. पूर्व पश्चिम विस्तार ११०० किमी, तर उत्तर
दक्षिण विस्तार १४०० किमी आहे. एकूण
क्षेत्रफळ १३ लाख चौरस किलो मीटर एवढ्या भूभागावर आहे. तर आकार त्रिकोणाकृती
आहे. समकालीन जगातील कोणत्याही संस्कृती पेक्षा ही आकाराने जगातील सर्वात मोठी
संस्कृती आहे.
ई.
हडप्पा
संस्कृतीतील प्रमुख स्थळे कोणती आहेत?:
a.
हडप्पा:
हडप्पा
शहराचा शोध १९२१ साली दयाराम सहानी यांनी लावला. या शहराच्या
नावावरून या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव देण्यात आले. हडप्पा शहर
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे. हडप्पा हे नाव तेथील एका छोट्याश्या
शहराचे नाव आहे. त्यावरून या शहराला हडप्पा हे नाव दिले आहे. हे सिंधू संस्कृतीचे
एक प्रमुख शहर होते. हे शहर रावी नदीच्या काठावर वसलेले होते. या शहराचे विभाजन
किल्ला व मैदानातील नगररचना असे दोन भागात झालेले होते. धान्याचे कोठार, कामगार वस्त्या, इ. चे अवशेष सापडतात. या
शहराची निर्मिती सुनियोजितरित्या केलेली आहे. या शहराची लोकसंख्या साधारणत:
२३५०० असेल. यावरून हे त्या काळातील एक अत्यंत मोठे शहर होते.
b.
मोहेंजोदारो:
‘मोहेंजोदारो’ हे
शहर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लाराखाना जिल्ह्यात सिंधू नदीच्या काठावर
सापडले आहे. स्थानिक लोक या ठिकाणाला ‘मृतांची टेकडी’ असे म्हणत.
‘मोहेंजोदारो’ या शब्दाचा सिंधी भाषेतील अर्थ ‘मृतांची टेकडी’ असा होतो. तर
काही लोक ‘मोहन’ म्हणजे ‘कृष्ण’ ची टेकडी असेही अर्थ लावला जातो. पण सिंधू
संस्कृतीत या शहराची नाव काय होते, हे मात्र अज्ञात होते. त्या काळात या शहराची लोकसंख्या ४०,०००च्या आसपास असावी असा अंदाज संशोधकांनी काढला आहे. या शहराचे
दोन भागात विभाजन झाले आहे. किल्ला व मैदानातील शहर. शहरात एक बाजारपेठ होती.
तेथे एक मोठी विहीर आहे. या शहरात सांडपाणी वाहून नेण्याची सोय आहे. ‘सार्वजनिक
महास्नानगृह’, धान्याची कोठारे, नृत्याच्या मुद्रेत असणारी तरुणी, धर्मगुरूचा
पुतळा, त्रिमुखी
पशुपतीचे प्रतिमा,
इ. महत्वाचे अवशेष मोहेंजोदारो या शहरात सापडले आहेत. १९९७ साली युनेस्कोने
‘जागतिक वारसा स्थळां’च्या(World Heritage)
यादीत मोहेंजोदारोचा
समावेश करण्यात आला.
c.
लोथल:
‘लोथल’ हे ठिकाण गुजराथमधील
अहमदाबादपासून ८० किमी अंतरावर ढोलक तालुक्यात सरगवाला गावाजवळ आहे. हे शहर भोगावा
नदीच्या काठावरील नैसर्गिक बंदर होते. या ठिकाणाहून सिंधू संस्कृतीतील
परराष्ट्र व्यापार चालत असावा. लोथलमध्ये ‘जहाजाची गोदी’(Dockyard) आहे.
जहाजाच्या गोदीत जहाजांची निर्मिती, दुरुस्ती होते. लोथल हे शहर संशोधक एस. आर. राव यांनी १९५४
साली शोधून काढले. लोथल मध्ये धान्याच्या कोठाराचे अवशेष सापडले आहेत. इथे एक
बाजारपेठ व मणी बनवणारे कारखान्याचे अवशेष सापडले आहेत.
d.
धोलाविरा :
धोलाविरा हे हडप्पा संस्कृतीतील एक शहर आजच्या गुजरात मध्ये
आहे. हे हडप्पा संस्कृतीतील चौथे मोठे शहर होते. धोलाविराचा शोध डी. पी.
जोशी(१९६७) व डॉ. आर. एस. बिष्ट यांनी १९९० मध्ये लावला. हडप्पा संस्कृतीतील
अनेक शहरे दोन भागात विभाजित आहेत धोलाविरा मात्र याला अपवाद आहे, धोलाविरा हे
तीन भागात विभाजित आहे. धोलाविरा
शहर हे वाळवंटी भागात असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठा तलाव बांधला आहे.
यावरून हडप्पा संस्कृतीती पाणी साठवण्याचे तंत्र लक्षात येते. या शहराची लोकसंख्या अंदाजे २०००च्या आसपास
असावी असा अंदाज काढला आहे. धोलाविरा
शहरात एक स्टेडियम सदृश्य इमारत आहे. येथील स्मशानभूमीवरून मृत्यूनंतरच्या
जीवनावर या लोकांचा विश्वास असावा हे लक्षात येते. पाण्याचा साठा आटल्याने या
शहराचा ऱ्हास झाला.
e.
कालीबंगन:
कालीबंगन
म्हणजे ‘काळी बांगडी’ होय.
कालीबांगन हे हडप्पा संस्कृतीतील राजस्थान मधील एक शहर आहे. हे शहर लुप्त
झालेल्या सरस्वती नदीच्या काठावर आहे. याचा शोध बी. के. लाल व थापर यांनी
लावला. या शहराची रचना मोहेंजोदारो सारखी आहे. काटकोनात छेदणारे रस्ते
सापडतात. पण वैशिष्टपूर्ण बाब अशी की, सांडपाण्याच्या व्यवस्थेचे अवशेष सापडत नाहीत. येथे यज्ञ कुंडाचे पुरावे आहेत. तसेच जमीन नांगरत
असल्याचे व दोन पिके घेत असल्याचे पुरावे सापडले आहेत. येथे भूकंप येऊन गेल्याचेही
पुरावे सापडतात. सरस्वती नदी आटल्याने साधारणत: इ.स.पु. १७०० च्या दरम्यान कालीबंगन शहर नष्ट झाले.
f.
राखीगढ :
राखीगढ हे शहर हरियाणा राज्यात सापडले आहे. १९९७ साली भारतीय
पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात हे शहर सापडले. हे एक हडप्पा संस्कृतीतील
प्रमुख शहर होते. मोहेंजोदडोनंतर हडप्पा संस्कृतीतील आकाराने सर्वात मोहते शहर
होते(२३० हेक्टर). या शहराला तटबंदी व प्रवेशद्वार आहे. या शहरात धान्याच्या
कोठाराचे अवशेष आहेत.
No comments:
Post a Comment