B.राष्टीय सभा किंवा कॉंग्रेसची
स्थापना : |
राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना ही भारताच्या
स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना मानली जाते. १७५७ ते
१८५७ या १०० वर्षात ब्रिटीशांनी भारत जिंकला. भारताचे राजकीय व प्रशासकीय एकीकरण
केले. तसेच पाश्चात्य शिक्षण व इंग्रजी भाषा यामुळे भारतीयांच्यात आधुनिक
विचारांचा प्रसार झाला. सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळीना सुरुवात झाली. या
चळवळीमुळे समता निर्माण होऊन राष्ट्रवादाचा उदय होण्यास मदत झाली. ब्रिटीशांच्या
वर्णद्वेषाच्या वागणुकीमुळे भारतीयांची मने दुखावली. ब्रिटीशांमुळे आपली आर्थिक
हलाखी ओढवली आहे. त्यासाठी स्वराज्याची गरज आहे अशी भावना निर्माण झली. तसेच लॉर्ड
लिटनच्या धोरणामुळे भारतीयांच्या असंतोषात वाढ झाली, १८५७ च्या उठावाने भारतीयांना
प्रेरणा मिळाली, या सर्वांचा परिणाम होऊन भारतात राष्ट्रवादाची भावना जागृत झाली.
१.कॉंग्रेसच्या
स्थापनेपूर्वीच्या राजकीय संघटना :
राष्ट्रवादाचा उदय झाल्यावर राजकीय संघटना
स्थापन व्हायला सुरुवात झाली १८५१ साली बंगाली राष्ट्रवाद्यांनी ‘ब्रिटीश
इंडिया असोसियशन’ स्थापन केले, १८५२ मध्ये ‘मद्रास नेटिव्ह
असोसियशन’ ची मद्रासमध्ये स्थापन झाली. १८७० मध्ये पुण्यात न्या.
रानडे व सार्वजनिक काका ‘सार्वजनिक सभा’ स्थापन केली. १८८४ साली
सुब्रह्मण्यम अय्यर यांनी ‘मद्रास महाजन सभा’ स्थापन केली. या
प्रादेशिक पातळीवरील संघटनांच्या स्थापनेनंतर आता राष्ट्रीय पातळीवर संघटना स्थापन
करण्याची गरज निर्माण झाली.
२.कॉंग्रेसची स्थापना :
वरील घटनांच्या पार्श्वभूमीवर २८
डिसेम्बर १८८५ या दिवशी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत
महाविद्यालयाच्या आवारात कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. ही सभा पुण्यात भरणार
होती, पण पुण्यात प्लेगची साथ आल्यामुळे ते मुंबईत भरले. कलकत्याचे वकील
उमेशचंद्र बनर्जी हे अधिवेशनाचे अध्यक्ष(कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष) होते.
देशभरातून ७२ प्रतिनिधी उपस्थित होते. ‘कॉंग्रेस’ या शब्दाचा अर्थ ‘एकत्र
येणे’ असा होतो. तिलाच ‘राष्ट्रीय
सभा’ असेही म्हणतात. काँगेसच्या स्थापनेत अँलन ह्यूम या निवृत्त सनदी
अधिकाऱ्याने पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना ‘कॉंग्रेसचे संस्थापक’ असे
म्हणतात
३.कॉंग्रेसची स्थापनेबद्दलचा सुरक्षा झडप सिद्धांत :
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत अँलन ह्यूम व
व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन यांनी पुढाकार घेतला, यावरून काही इतिहासकार असा निष्कर्ष
काढतात कि, १८५७ नंतर भारतातील विविध वर्गात विविध कारणासाठी असंतोष निर्माण झाला
होता. १८५७ सारखा उठाव होण्याची भीती सरकारला वाटू लागली. त्यामुळे सरकारने
पुढाकार घेऊन लोकांच्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी कॉंगेसची स्थापना केली.
अशाप्रकारे सरकारने ‘सुरक्षा झडप’ सारखा वापर करण्यासाठी कॉंग्रेसची
स्थापना केली.
डॉ. बिपीन चंद्र
यांनी या सिद्धांताशी संबंधित सर्व कागदपत्रांचा अभ्यास केला व हे सिद्ध केले की,
कॉंगेसची स्थापना सुरक्षा झडप म्हणून झाली नाही ही एक दंतकथा आहे. कॉंगेसची
स्थापना एक ऐतिहासिक अपघात नसून तर अनेक दशके प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे
फलित आहे.
No comments:
Post a Comment