Sunday, 19 February 2023

शिवजयंतीनिमित्त पॉकेट मनीमधील पैशातून सामाजिक संस्थामध्ये फळ वाटप

शिवजयंतीनिमित्त पॉकेट मनीमधील पैशातून सामाजिक संस्थामध्ये फळ वाटप – अजितजी बोरा   
सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंतीनिमित्त पॉकेट मनी व वर्गणी गोळा करून जमा झालेल्या रक्कमेतून सामाजिक संस्थेत फळांचे वाटप केले. ‘शिवजयंती विधायक पद्धतीने साजरी करण्याचा वस्तुपाठ सारडा महाविद्यालयाचे विद्यार्थी घालून देत आहेत. कोविड काळाचा अपवाद सोडल्यास ते सातत्यपूर्णरित्या शिवजयंतीनिमित्त सामाजिक संस्थात जाऊन फळांचे वाटप करतात. त्यासाठी पदरमोड करून पैसे जमा करतात. त्यामुळे त्यांना मदत करणे व त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक व कनिष्ठ महाविद्यालय समिती सदस्य अजितजी बोरा यांनी केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज समाजातील सर्वाना वंदनीय आहेत. त्यांचा आदर्श युवकांनी डोळ्यापुढे ठेवावा, त्यांनी ध्येय ठरवावे व ध्येयसिद्धीसाठी प्रयत्न करावा’ असा शुभेच्छा संदेश महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ माहेश्वरी गावित यांनी दिला. यावेळी शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण व पूजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ सुरेखा गांगुर्डे यांनी केले तर सूत्र संचालन डॉ कृष्णा पाटील यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ गायकवाड, संघराज गायकवाड व ऋषीकेश गडाख यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts