Thursday 1 September 2022

युनिट १. २. इतिहासाची साधने :

प्रकरण १ साधने व प्रागैतिहासिक काळ

2. इतिहासाची साधने :

१. पुरातत्वीय साधने, २. आलेख(शिलालेख, गुफालेख) ३. नाणी, ४. वान्डगमयीन साधने, ५. परकीय प्रवासवर्णन

 

१.प्राचीन भारताच्या इतिहासाची पुरातत्वीय किंवा अलिखित साधने


इतिहासाचा अभ्यास साधनाशिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच ‘No Sources No History’ म्हणजे ‘साधने नाहीत तर इतिहास नाही’ असे म्हंटले जाते. माणसाच्या शरीरात जे पाठीच्या कण्याला (Back Bone) तेच इतिहासात साधनांना महत्व असते. माणसाच्या जिवंत माणसाच्या शरीरात जे पाठीच्या कण्याला (Back Bone) तेच इतिहासात साधनांना महत्व असते. माणसाच्या जिवंत राहण्यासाठी जे श्वासाला महत्व असते तेच इतिहासामध्ये साधनांना महत्व असते. त्यामुळेच साधन म्हणजे काय? प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधने उपलब्ध आहेत? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

साधन म्हणजे काय?

·               साधन म्हणजे पुरावा होय.’

·               ‘इतिहासचे लिखाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लिखित किंवा पुरातत्वीय पुराव्यास साधन असे म्हणतात.’

साधनाचे प्रकार कोणते ?

सामान्यपणे साधनाचे प्रमुख दोन प्रकार पडतात

a. प्राथमिक साधने(Primary Sources) - घटना घडत असताना प्रत्यक्ष दर्शी साक्षीदाराने लगचेच लिहून ठेवलेल्या कागदपत्रांना ‘प्राथमिक साधन’ असे म्हणतात.

b. दुय्यम साधने(Secondary Sources) घटना घडून गेल्यानंतर बऱ्याच कालावधीने किंवा एकीव माहितीवर आधारित निर्माण झालेल्या कागदपत्रांना ‘दुय्यम साधन’ असे म्हणतात.

याशिवाय प्राचीन भारताच्या उपलब्ध साधनांच्या दृष्टीने साधनांचे खाली दोन प्रकार पडले जातात.

A.पुरातत्वीय किंवा अलिखित साधने (Archealogical Sources)

B.वाङमयीन किंवा लिखित साधने (Written Sources)

यातील पुरातत्वीय साधने पुढीलप्रमाणे सांगता येतील.

a

पुरातत्वीय किंवा अलिखित साधने

 

 

  सा

 

 

 

  ने

b

वाङमयीन (साहित्यिक) साधने

१.              

प्राचीन वस्तूंचे अवशेष

१.              

वैदिक साहित्य

२.              

नाणी

२.              

महाकाव्ये

३.              

शिलालेख

३.              

पुराणे

४.             

ताम्रपट

४.             

बौध्द धर्म साहित्य

५.             

बौध्द विहार

५.             

जैन धर्म साहित्य

६.              

बौध्द स्तूप

६.              

स्मृती ग्रंथ

७.             

बौध्द चैत्य

७.             

नाटके व काव्ये

८.              

मंदिरे

८.              

कौटिल्याचे अर्थशास्त्र

९.              

मूर्ती

९.              

विज्ञानविषयक साहित्य

१०.         चित्रकला

११.          

परकीय प्रवाशांचे वृतांत

 











A. पुरातत्वीय किंवा अलिखित साधने (Archealogical Sources)

१.             पुरातत्वाविद्या (Archeaology) म्हणजे काय?

“उत्खननात सापडलेल्या वस्तू, नाणी, ताम्रपट, स्मारके, मंदिरे, लेण्या, या अवशेषाना ‘पुरातत्वीय अवशेष’ असे म्हणतात. या पुरातत्वीय अवशेषांचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेस ‘पुरातत्वविद्या’ असे म्हणतात.” अशा अवशेषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन ब्रिटिश काळात दिले गेले. त्यासाठी १७८४ साली ‘एशियाटिक सोसायटी’ या संस्थेची स्थापना सर विल्यम जोन्स यांनी पुढाकार घेऊन केली. तर पुरातत्वविद्येचा अभ्यास व पुरातत्वीय अवशेषांचे जतन करण्यासाठी १८६० साली ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण’ या खात्याची स्थापना केली. सर कनिंगहम, सर जॉन मार्शल, हे या खात्याचे काही संचालक होते.

२.             प्राचीन वस्तूंचे अवशेष :

ऐतिहासिक स्थळांचे उत्खनन करत असताना अनेक अवशेष सापडतात. त्या अवशेषांचा उपयोग इतिहास लेखनासाठी होतो. उदा. १९२१ मध्ये सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीचे अवशेष हडप्पा व मोहेंजोदाडो या ठिकाणी उत्खननात सापडले. हडप्पा संस्कृतीच्या सवर्च अंगांचा अभ्यास या अवशेषांच्या आधारे केला जातो. ज्यामध्ये नगरांचे अवशेष, सार्वजनिक स्नानगृह, धान्यकोठारे, सार्वजनीक इमारती, घरे, हत्यारे, अवजारे, खेळणी, हाडे, दगड, मुर्त्या, शिक्के, प्रतिमा, अलंकार, सौंदर्यप्रसाधने  इ. अवशेषांचा समावेश होतो. त्यांच्या आधारे सिंधू संस्कृतीची नगररचना, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, धर्म, ऱ्हासाची कारणे इ. सर्व गोष्टींचा इतिहास लिहिला आहे.


३.             नाणी (Coins) :

नाणी हे इतिहासाचा अभ्यास करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. नाण्यावरून पुढील माहिती मिळू शकते

अ.           नाणी ज्या प्रदेशात सापडतात त्यावरून राज्याचा विस्तार कळू शकतो.

आ.         नाण्याच्या धातूवरून राज्याची आर्थिक परिस्थिती कळू शकते उदा. चंद्रगुप्त विक्रमादित्य या गुप्त सम्राटाची सर्वाधिक सोन्याची नाणी सापडतात त्यावरून याचा काळ आर्थिक भरभराटीचा काळ होता असा निष्कर्ष इतिहासकार मांडतात.

इ.             नाण्यावरील सनावळी वरून राजाचा कालावधी कळू शकतो.

ई.             नाण्यावरून तत्कालीन भाषा, लिपी यांचे ज्ञान होऊ शकते.

उ.            नाण्यावरील चिन्हावरून राजाचे धार्मिक धोरण, कलेची आवड, केशभूषा, वेशभूषा, समजते.

ऊ.          भारतीय नाणी परदेशात सापडतात त्यावरून परकीय व्यापाराची माहिती मिळते.

४.            शिलालेख :

‘शिलालेख’ म्हणजे ‘दगडी शिलेवर कोरलेला लेख’ होय. शिलालेख हे इतिहासाचे एक विश्वसनीय व अविनाशी साधन आहे. मंदिर, गुहा, सार्वजनिक ठिकाणे शिलालेख कोरलेले आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती देणारा पहिला शिलालेख मध्य आशियातील ‘बोगाजाकाई शिलालेख’ या ठिकाणी सापडला. यावरून आर्यांच्या उगमस्थानाबद्दल माहिती मिळते. प्राचीन काळातील सर्वाधिक सुप्रसिद्ध, संख्येने प्रंचड व अत्यंत महत्वाचे शिलालेख म्हणजे ‘अशोकाचे शिलालेख’ होय. हे शिलालेख ब्राह्मी, खरोष्टी, अरेमाईक लिपीत आहेत. जेम्स प्रिन्सेप याने ब्राह्मी लिपी सर्वप्रथम वाचली त्यामुळे ‘अशोकाच्या धम्म’ तत्वांची माहिती मिळाली. प्राचीन काळातील आणखी महत्वाचा शिलालेख म्हणजे ‘गिरनार शिलालेख’ होय. गुजरात मधील सौराष्ट्र मधील गिरनार या ठिकाणी आहे. हा शिलालेख शक राजा रुद्रदामन याने संस्कृत भाषेत कोरला आहे. या शिलालेखात ‘सुदर्शन तलावाचा इतिहास’ आहे. यासोबतच ‘प्रयाग प्रशस्ती’ किंवा ‘अलाहाबाद प्रशस्ती’ हा गुप्त काळातील महात्वाचा शिलालेख आहे. या शिलालेखात गुप्त सम्राट समुद्रगुप्त च्या पराक्रमाबद्दल माहिती आहे. समुद्रगुप्ताचा दरबारी कवी हरीषेण याने हा शिलालेख कोरला आहे.

५.            ताम्रपट :

“तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवलेल्या मजकुरास ‘ताम्रपट’ असे म्हणतात.” जमिनीचे दान, देणगी, इ.

 संबंधात संबंधात ताम्रपट असतात. ताम्रपटात राजाच्या वंशावळी, साम्राज्यविस्तार, पराक्रम, धार्मिक व राजकीय धोरणे, इ. ची माहिती ताम्रपटावरून माहिती मिळते ते इतिहासाचे अविनाशी साधन आहे.

६.             स्तूप :

‘स्तूप’ म्हणजे बौध्द भिक्षुंच्या समाधी किंवा थडगी होय. गौतम बुध्द, बौध्द भिक्षुच्या मृतावाशेष जसे कि दात, हाडे यावर उभारलेल्या वास्तूला ‘स्तूप’ असे म्हणतात.

Figure 1 सांचीचा स्तूप, निर्मिती-सम्राट अशोक, मध्य प्रदेश

सांची, सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर, इ स्तूप अत्यंत प्रसिध्द आहेत. सांचीचा स्तूप हा भारतातील सर्वात मोठा स्तूप आहे. तो सम्राट अशोकाने बांधला. अशोकाने ८४००० स्तूप बांधल्याचा उल्लेख येतो. सम्राट कनिष्कानेही अनेक स्तूप उभारल्याची माहिती सापडते. महाराष्ट्रात सातवाहन काळात विशेषत: इ.स.पु. २०० च्या सुमारास अमरावती येथील स्तूप वाढवला गेला. या पुनर्बांधणीमुळे तो खुपच भव्य स्तूप बनला. त्याच्या घुमटाचा आकार सुमारे ५३ मीटर असून उंची ३३ मीटर आहे. बुद्धांच्या आयुष्यातील प्रसंग तेथे कोरलेले आहेत. असाच स्तूप ‘नागर्जुकोंडा’ येथेही आहे.

७.            चैत्य :

‘चैत्य हे मंदिर किंवा सभागृह असे’’. ईश्वराची अक्षर व अविकार्य स्वरूपाला साजेसे चिरंतन गृह देवासाठी करावे या कल्पनेतून गुहा कोरण्याची पद्धती निर्माण झाली असावी. कोरण्यास सोयीचे असे कातळ प्रस्तर भारतात उपलब्ध असल्याने त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. पूजनासाठी असणाऱ्या स्तुपास चैत्य व चैत्य असणाऱ्या मंदिरास चैत्यगृह असे म्हणतात. 

Figure 2: चैत्यगृह(बाहेरून), अजंता, महाराष्ट्र

Figure 3 : चैत्यागृह(आतून), अजंता, महाराष्ट्र

चैत्यांमध्ये स्तभांच्या वैशिष्टपूर्ण रांगा आढळतात. कार्ले येथील चैत्य सर्वात भव्य व सुंदर आहे. ४० मीटर लांब, १५ मीटर रुंद व १५ मीटर उंच अशी या सभागृहाची मोजमापे आहेत. भव्य प्रवेशद्वार, त्याच्या वेदिकांवर नक्षीकाम, मंडपाच्या दुतर्फा स्तंभाच्या रांगा मध्यभागी घुमटाकार स्तूप, विविध शिल्पांकित प्रतिमा यामुळे हे चैत्यगृह प्रेक्षणीय बनले आहे.

८.             विहार :

“बौध्द भिक्षुंना राहण्यासाठी बांधलेल्या वास्तूला ‘विहार’ असे म्हणतात”. बौध्द भिक्षू पावसाळा सोडून इतर ऋतूत धर्मप्रसाराचे काम करत असत, पावसाळ्यात ते डोंगरातील गुहांच्या आश्रयाने राहत असत. पुढे भिक्षुंना राहण्यासाठी डोंगर खोदून अखंड त्यातून गुहा कोरल्या. त्यालाच ‘विहार’ असे म्हणतात.

Figure 4: विहार, नाशिक

या विहारातूनही लोकशिक्षणाचे कार्य चाले. विहारातून पुढे जगप्रसिध्द विद्यापीठांची निर्मिती झाली. महाराष्ट्रात कार्ले, भाजे, नाशिक येथील विहार प्रेक्षणीय आहेत. याशिवाय देशभर अनेक विहार आहेत.

९.             चित्रकला व शिल्पकला :

अजिंठा येथील जगप्रसिध्द चित्रकला व शिल्पकला आहे. यातील ८,,१०,१२,१३, क्रमांकाची लेणी सातवाहन काळातील आहेत. गुप्त काळात तर यातील बरीच चित्रे चित्रित केली आहेत.

१०.         मंदिरे:

मंदिरे ही धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय इतिहासाची महत्वाची साधने आहेत. मंदिर स्थापत्याचे गुप्त काळापूर्वीचे फारसे अवशेष मिळत नाहीत. प्राचीन भारताच्या इतिहासात प्रामुख्याने तीन प्रसिध्द शैली आढळून येतात.

११.         मुर्त्या :

सिंधू संस्कृत्तीपासूनच्या दगड, सोने, चांदी, तांबे, कासे, यांच्या प्रचंड मूर्ती उपलब्ध आहेत. राजाश्रय, बौध्द आणि जैन धर्म यांच्या आश्रयाने मुर्तीकलेचा विकास झाला. गांधार शैली, मथुरा शैली या मुर्तीकलेच्या प्रमुख शैली आहेत.

-----------------------------------------------------------------

B.अभिलेख(शिलालेख, स्तंभालेख, ताम्रपट)

विश्वसनीय व अविनाशी साधन :

अभिलेख हे इतिहासाचे एक अत्यंत विश्वसनीय साधन आहे. कित्येक वर्षापूर्वी निर्मिती होऊनही ते जसेच्या तसे टिकून असतात. त्यातील मजकुरात कोणीही बदल करू शकत नाही, त्यामुळे त्यामधील माहिती अत्यंत विश्वसनीय असते.

ते कागद व इतर साधनांपेक्षा अत्यंत टिकावू साधनावर कोरलेले असतात त्यामुळे त्यांना अविनाशी साधन म्हणतात.

अभिलेखांचे जतन :

देशातील विविध संग्रहालयात अभिलेख सुरुक्षित आहेत. सर्वात जास्त अभिलेख म्हैसूर पुराभिलेखागरात संरक्षित आहेत. प

I.शिलालेख व स्तंभालेख: 

व्याख्या : ‘प्राचीन काळातील शीलेवर(मोठ्या दगडावर) कोरलेल्या मजकुरास ‘शिलालेख’ असे म्हणतात’

तर ‘दगडी स्तंभावर कोरलेल्या मजकुरास ‘स्तंभांलेख’ असे म्हणतात.

१.बोगाजकाई शिलालेख :  

इसपू १५०० च्या दरम्यान मध्य आशियात सापडलेला हा भारताच्या इतिहासातील पहिला महत्वाचा शिलालेख आहे. हा शिलालेख आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल माहिती देतो. त्यात मध्य आशियातील दोन रानटी जमातीमधील युद्धानंतरचा तह कोरला आहे. त्या कराराच्या सुरुवातील इंद्र, वरुण, अग्नी, इ. देवतांची नावे आहेत. याच आर्यांच्याही देवता आहेत. यावरून या जमाती व आर्य मध्य आशियात एका ठिकाणी राहत असतील. म्हणजे आर्य मुळचे मध्य आशियातील असावे.

२.अशोकाचे शिलालेख:

प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्वात जुने शिलालेख अशोकाचे आहेत. हे शिलालेख ब्राह्मी, खरोष्ट्री व अरेमाईक असे तीन लिपीत आहेत. यातील ब्राह्मी लिपीचे वाचन जेम्स प्रिन्सेप याने केले. त्यामुळे भारतीय इतिहासाच्या एका नव्या आकलनास सुरुवात झाली. अशोकाने कोरलेले हे शिलालेख म्हणजे त्याचे आत्मचरित्रच आहे.

या शिलालेखातून अशोकाच्या धर्माज्ञा कोरल्या आहेत. ज्यावरून अशोकाच्या धम्म नीतीवर प्रकाश पडतो. अशोकाच्या लोककल्याणकारी राज्य करण्याची नीती लक्षात येते. अशोकाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावर प्रकाश पडतो.

३.गिरनार शिलालेख :

गुजराथमधील सौराष्ट्र या ठिकाणी गिरनार येथे सुदर्शन तलावाजवळ एक शिलालेख सापडला आहे. तो संस्कृत भाषेत आहे. सौराष्ट्रावर राज्य करणारा शक राजा रुद्रदामन याने हा शिलालेख कोरला आहे. या शिलालेखात सुदर्शन तलावाचा इतिहास आहे. या तलावाची निर्मिती चंद्रगुप्त मोर्याने केली. सम्राट अशोकाच्या काळात या तलावाचा बांध फुटला. त्याने सरकारी तिजोरीतून या तलावाची दुरुस्ती करून घेतली. अशीच दुरुस्ती शक राजा रुद्रदामन यानेही करून घेतली. पुढे गुप्त राजा कुमारगुप्त यानेही केली. यावरून प्राचीन राजांची लोककल्याणकारी भूमिका स्पष्ट होते.

४.सातवाहनाकाळातील शिलालेख :

महाराष्ट्र व आंध्र प्रदेशावर राज्य करणारे सातवाहन राज्यकर्त्यांचे ५० शिलालेख सापडले आहेत. नाशिक, पितळखोरा, कार्ले-भाजे, जुन्नर, कान्हेरी, नाणेघाट येथे सापडले आहेत. सातवाहनकाळाचा अभ्यास करण्यासाठी हे शिलालेख अत्यंत उपयुक्त आहेत.

४.कलिंगचा राजा खारवेलचा हाथीगुंफा शिलालेख : या शिलालेखात राजा खारवेलची माहीती आहे.

५.ऐहोळे शिलालेख :

आजच्या कर्नाटकवर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्यातील राजा पुलकेशी दुसरा याची माहिती ऐहोळे येथील शिलालेखात कोरली आहे. यात पुलकेशी दुसरा याने सम्राट हर्षवर्धानाचा पराभव केल्याची माहिती आहे.

II. स्तंभालेख :

अशोकाचे स्तंभालेख 

III. ताम्रपट :

“तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवलेल्या मजकुरास ‘ताम्रपट’ असे म्हणतात.” जमिनीचे दान, देणगी, इ.

 संबंधात संबंधात ताम्रपट असतात. ताम्रपटात राजाच्या वंशावळी, साम्राज्यविस्तार, पराक्रम, धार्मिक व राजकीय धोरणे, इ. ची माहिती ताम्रपटावरून माहिती मिळते ते इतिहासाचे अविनाशी साधन आहे

 

C.नाणी (Coin) :

नाणी हे इतिहासाचा अभ्यास करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. प्राचीन काळात समाज संघटीत झाला. तेंव्हा देवाणघेवाण करण्यासाठी सुरुवातीच्या काळात वस्तूविनिमय पद्धती सुरु होती. पुढे आर्थिक विकास झाल्यावर नाणी प्रचारात आली. नाण्याचा अभ्यास करणारे स्वतंत्र शास्त्र विकसित झाले. त्याला नाणकशास्त्र(NUMISTMATIC) म्हणतात. नाणी हा इतिहासाच्या अभ्यासाचा समकालीन व अत्यंत विश्वासाहार्य पुरावा आहे. नाण्यावरून पुढील माहिती मिळू शकते

1.         राजकीय माहिती :

प्राचीन काळात सापडणाऱ्या नाण्यावरून विविध राजांची माहिती मिळते. राजाचा कालखंड नाण्यावर कोरला असेल तर त्या राजाचा निश्चित असा कालखंड कळू शकतो. राजा कोणत्या घराण्यातील आहे. तसेच त्याचे कोणत्या इतर कोणत्या घराण्याशी काही विशिष्ठ संबध आहेत काय याचीहि माहिती नाण्यांवरून समजू शकते. विशेष महत्वाचे म्हणजे नाणी ज्या प्रदेशात सापडतात त्यावरून राज्याचा विस्तार कळू शकतो.

2.           आर्थिक स्थिती कळते:

नाण्याच्या धातूवरून राज्याची आर्थिक परिस्थिती कळू शकते उदा. चंद्रगुप्त विक्रमादित्य या गुप्त सम्राटाची सर्वाधिक सोन्याची नाणी सापडतात त्यावरून याचा काळ आर्थिक भरभराटीचा काळ होता असा निष्कर्ष इतिहासकार मांडतात.

3.           परकीय व्यापाराची माहिती : भारतीय नाणी परदेशात सापडतात तसेच परकीय नाणी भारतात सापडतात. त्यावरून परकीय व्यापाराची माहिती मिळते. उदा. सातवाहन राजांची नाणी रोममध्ये सापडली आहेत. तर रोमन नाणी महाराष्ट्रात सातवाहन राज्यात सापडतात त्यावरून त्यांच्या परस्पर असलेल्या व्यापारी संबंधाची माहिती मिळते.

4.           कला, साहित्य, संगीत विषयी माहिती : नाण्यावरून राज्याची कला, साहित्य, संगीत याविषयीची माहिती समजू शकते. उदा. समुद्र गुप्ताने आपल्या सोन्याच्या नाण्यांवर वीणा वाजवतानाची प्रतिमा कोरली आहे. यावरून तो संगीत कलेच भोक्ता होता असा निष्कर्ष इतिहासकार काढतात. नाण्याचा आकार, सुबकता यावरून तत्कालीन कलेच्या प्रगतीची माहिती मिळते.  तसेच वेशभूषा, केशभूषा, यांचीही माहिती नाण्यांवरून मिळते.

5.           तत्कालीन भाषा, लिपी यांचे ज्ञान :  नाण्यांवर जे लेखन कोरले असते त्यावरून तत्कालीन भाषा तसेच लिपीची माहिती मिळते. तसेच राज्याने कोणत्या भाषेला व लिपीला प्रोत्साहन दिले याचेही ज्ञान होते.

6.           धार्मिक माहिती : नाण्यावरील चिन्हावरून राजाचे धार्मिक धोरण समजते. उदा. चंद्रगुप्तांना पहिला याने आपल्या नाण्यावर दुर्गेची प्रतिमा कोरली आहे त्यावरून त्याने हिंदू धर्माला प्रोत्साहन दिल्याचे लक्षात येते.

अशाप्रकारे नाणी ही इतिहासाचे एक अत्यंत विश्वासार्ह साधन आहे. त्यावरून राजकीय, आर्थिक, व्यापार, कला-संगीत, राजाचे धार्मिक घोरण जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. या नाण्यांच्या आधारे प्राचीन भारताच्या इतिहासातील विविध कालखंडांचा अभ्यास करता येतो.  त्याचा आढावा पुढीलप्रमाणे:

------------------------------------------------------------

D.वाङमयीन साधने: (लिखित साधने) :

--------------------------------------------------------------

वाङमयीन साधनांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

अ.           धार्मिक साहित्य(Religious Leterature): वैदिक साहित्य, महाकाव्य, जैन व बौद्ध धर्माचे साहित्य, स्मृतीग्रंथ इ.

आ.         निधर्मी साहित्य (Secular Literature) : निधर्मी साहित्यात पुढील साहित्याचा समावेश होतो.

Ø    चरित्रग्रंथ - हर्षचरीत,

Ø    नाटके कालिदासाची नाटके(मालविकाग्नीमित्र, शाकुन्तल, विक्रमौर्वोशिवम) भास(स्वप्नवासवदत्त, चारुदत्त), भवभूती(महावीरचरित, मालतीमाधव), शुद्रक(मृच्छकटिक), हर्षवर्धन

Ø    काव्ये कालिदासाचे रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, ऋतूसंहार, दंडीचे दशकुमारचरित, 

Ø    शास्त्रीय ग्रंथ कौटिल्याचे अर्थशास्त्र, आर्यभट्टाचे आर्यभट्टीय, वराहमिहिरचा पंचसिद्धान्तिका, वाग्भटचा अष्टांगहृदयसंहिता, इ.

इ.             परकीय प्रवासवर्णने

 

अ.           धार्मिक साहित्य(Religious Leterature):

a.वैदिक साहित्य :

१.वेद :

वेद म्हणजे ‘जाणून घेणे’ होय. वेद म्हणजे ‘ज्ञान’ होय. वेदांना ‘अपौरुषेय’ म्हणजे ‘मनुष्यनिर्मित नव्हे, तर दैवी’ आहेत असे मानले जाते. प्रत्यक्षात ते विविध ऋषींनी शतकानुशतके रचलेल्या प्रार्थना आहेत. चार वेद आहेत -

i.ऋग्वेद :

हा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. हा पहिला व सर्वात जुना वेद आहे. इ.स.पु. १३०० ते १०००  हा बहुधा ऋग्वेद निर्मितीचा काळ असावा. ऋग्वेदाचे दहा मंडले(विभाग) आहेत. त्यात १०२८ ऋचा(स्तोत्रे) आहेत. ‘ऋचा’ म्हणजे आर्यांनी देवताना उद्देशून केलेल्या प्रार्थना आहेत. आर्यांच्या आरंभीच्या जीवनाची माहिती ऋग्वेदात मिळते. 

ii.सामवेद:

‘सामन्’ म्हणजे ‘गाणे’ त्यापासून ‘साम’ हा शब्द तयार झाला आहे. सामवेद हा पठण ग्रंथ आहे. यज्ञाच्या वेळी ऋग्वेदातील ऋचांचे पठण करण्याच्या किंवा गाण्याच्या पध्दती यात संग्रहित करण्यात आल्या आहेत. ‘सामवेदाला भारतीय संगीताची जननी’ असे म्हणतात.

iii. यजुर्वेद :

यज्ञाच्या वेळी म्हणावयाच्या मंत्राना ‘यजुस’ असे म्हणतात. त्यावरून यजुर्वेद हा शब्द बनला आहे. अशा मंत्रांचे संकलन यजुर्वेदात केले आहे. यजुर्वेदाचे शुक्ल व कृष्ण असे दोन भाग आहेत.

iv.अथर्वेद :

यज्ञविधी करणाऱ्या ब्राह्मण पुरोहिताला मार्गदर्शन करण्यासाठी या ग्रंथाची रचना केली आहे. हा अखेरचा वेद आहे. दुष्ट शक्तींचा नाश व रोगमुक्ती, जादूटोणा, भुताटकी, मंत्रतंत्र याविषयींच्या ऋचांचा समावेश यात केला आहे.

२.  ब्राह्मण ग्रंथ :

यज्ञ करताना म्हणायच्या मंत्राचे स्पष्टीकरण करण्यासाठी काही ऋषींनी हे ग्रंथ रचले. त्यांना ‘ब्राह्मणग्रंथ’ असे म्हणतात.

३.आरण्यके :

‘आरण्यके’ हे वनवासी ऋषींनी वाचण्याची पुस्तके आहेत. ही ब्राह्मणग्रंथाचा पुढचा भाग आहेत. अरण्यात राहणाऱ्या ऋषींच्या चिंतनातून ‘आरण्यके’ निर्माण झाली. प्रत्येक वेदाची ‘आरण्यके’ आहेत.

४.उपनिषदे :

‘उपनिषद’ या मूळ शब्दाचा अर्थ, “आपल्या गुरूच्या सानिध्यात बसून शिक्षण घेणे.’ होय. उपनिषद ब्राह्मण ग्रंथाच्या शेवटी(अंती) येतात म्हणून त्यांना ‘वेदांत’ असेही म्हणतात. उपनिषदांची संख्या १०८ आहे. यात ब्रह्म, आत्मा, याविषयी चिंतन केले आहे. विश्वाची उत्पत्ती कशी झाली असेल याचा विचार उपनिषदात आहे. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रिदवाक्य ‘मंडूक उपनिषद’ मधून घेतले आहे.

५.वेदांगे :

शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदशास्त्र, ज्योतिष्यशास्त्र अशी सहा वेदांगे आहेत. ती वेदांची पूरक शास्त्रे आहेत.

६.महाकाव्ये :

दीर्घकाव्यांना ‘महाकाव्ये’ म्हणतात.  रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये आहेत.

i.रामायण :

रामायणाची रचना वाल्मिकीने केली. ती आयोध्यचा राजा राम याची कथा आहे. आयोध्येचा राजा दशरथ असतो. त्याला राणी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी चार मुले असतात. रामाने राजा व्हावे अशी दशरथाची इच्छा असते. पण त्याची सावत्र आई कैकयी ची ला तिचा मुलगा भरत राजा व्हावा असे वाटत असते. ती काही कारणाने असे वचन दशरथ कडून घ्यायला यशस्वी होते व तिच्या इच्छेनुसार दशरथ रामाला चौदा वर्षे वनवासाची शिक्षा पाठवतो. रामाची पत्नी सीता व रामाचा भाऊ लक्ष्मण दोघेही रामाला साथ द्यायचे ठरवतात व रामाबरोबर वनवासाला निघून जातात. वनसाच्या काळात लंकेचा राजा रावण सिताचे अपहरण करतो. राम व लक्ष्मण सीतेचा शोध घेतात व हनुमान व त्याची वानरसेना यांच्या मदतीने सीताला रावणाच्या कैदेतून मुक्त करतात. अशी ही कथा आदर्श राजा, आदर्श मुलगा, आदर्श पत्नी, आदर्श भाऊ, अशा कसे असावेत या नीतीमूल्यांची  शिकवण देते.

ii.महाभारत :

महाभारत हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे . त्यामध्ये एक लाख श्लोक आहेत. ही कौरव व पांडव यांच्यातील संघर्षाची कथा आहे. सत्ता महत्वाची असते. राजकारणात सत्तेपुढे नातेसंबंध महत्वाचे नसतात अशी शिकवण ही कथा देते.

या कथा खरच घडून गेल्या का? त्यांचा काळ कोणता होता? याबद्दल सत्य माहिती सांगता आलेली नाही.

७. पुराणग्रंथ :

भारतीय इतिहासाच्या अभ्यासात पुराणांना फार महत्वाचे स्थान आहे. भारताच्या तत्कालीन भौगोलिक परिस्थितीतीचे वर्णन, राजकीय, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनावर पुराणग्रंथ प्रकाश टाकतात. मुख्य पुराणे १८ व उपपुराणे १८ आहेत. विष्णू, नारद, भागवत, गरुड, पद्म, वराह, ब्रह्मांड, ब्रह्मवर्त, मार्कंडेय, भविष्य, वामन व ब्रह्म, मत्स्य, कूर्म, लिंग, स्कंद व अग्नी, इ. पुराणे आहेत. पुराणातून इतिहास लिहिण्यासाठी उपयुक्त अशी माहिती मिळते. नंद, मौर्य, शुंग, कण्व, सातवाहन इ. राजघराण्यांची माहिती मिळते.

८.स्मृतिग्रंथ:

‘स्मृती’ या शब्दाचा अर्थ आठवलेली माहिती. स्मृतीग्रंथास धर्मशास्त्र हे दुसरे नाव आहे. हिंदू कायद्याचे प्राचीन ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती. विष्णूस्मृती, नारदस्मृती, पाराशरस्मृती, बृहस्पतीस्मृती, इ. महत्वाचे स्मृती ग्रंथ आहेत.

ब.बौध्द धर्माचे साहित्य:

       त्रिपिठके हे बौध्द धर्मियांचे पवित्र ग्रंथ आहेत. त्रिपीठके हे.i.विनयपिठक, ii.सुत्तपिठक-, iii. अभिधम्मपिठक- असे तीन ग्रंथ आहेत अधिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ वा धर्माची सर्वश्रेष्ठ तत्वे होय.

याशिवाय अश्वघोष या बौध विद्वानाने बुध्दचरित हा ग्रंथ लिहिला आहे. यात बुद्धांचे जीवनचरित्र अलंकारिक भाषेत लिहिले आहेत. हे बौध्द धर्मियात खूप लोकप्रिय होते. ते संस्कृत भाषेत आहे.

तसेच जातककथा- या बुद्धांच्या पूर्व जन्मीच्या कथा आहेत. या कथांनी वाङमय, शिल्प, कला यांना अनेक विषय पुरवले. भारहूत व सांची येथील स्तुपावर जातककथा कोरल्या आहेत. या कथा अंत्यत सुगम व सरस भाषेत लिहल्या आहेत. तर .मिलिंदपन्हो(मिलीन्दाचे प्रश्न) हा ग्रीक राजा मिन्यांडर व बौध्द भिक्षु नागसेन यांच्यातील प्रश्नोत्तररूप संवाद या ग्रंथात आहे.

क. जैन धर्मविषयक साहित्य:

संस्कृत, अर्धमागधी, प्राकृत, कन्नड, तमिळ इ. भाषेत जैन आचार्य व कवी यांनी विपुल साहित्य लिहिले आहे. १२ आगमग्रंथ हे १२ ग्रंथ असून ते जैन धर्मियांचे पवित्र ग्रंथ आहेत.  त्यात अहिंसा, भूतदया याबद्दल उपदेश, जैन मुनींच्या आयुष्यक्रमाबद्दल माहिती या ग्रंथांमध्ये दिली आहे.

ब.निधर्मी साहित्य:

a.चरित्रग्रंथ उदा. हर्षचरीत: हा ग्रंथ बाणभट्ट या कवीने लिहिला आहे. हा ग्रंथ सम्राट हर्षवर्धानाचे चरित्र आहे. हर्षवर्धनाची कारकीर्द व ७व्या शतकातील भारत समजून धेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्वाचा आहे. या ग्रंथात हर्षाचे पुरवण, ठाणेश्वरचा इतिहास, हर्षाच्या युद्धमोहिमा, तत्कालीन धार्मिक पंथ, हर्षाचे प्रशासन, समाजजीवन, रूढी, हर्षाचा दरबार, दानशूरपणा, इ. गोष्टींची विश्वसनीय माहिती या ग्रंथात मिळते. मात्र या ग्रंथात अनेक दोष आहेत, त्यात हर्षाची बऱ्याचवेळी हर्षाची खोटी स्तुती केली आहे. कालखंड दुर्लक्षित केला आहे आणि हा ग्रंथ अपूर्ण आहे.

bनाटके

१. महाकवी कालिदासाची नाटके- कालिदासाची तीन नाटके प्रसिद्ध आहे. त्यातील मालविकाग्नीमित्र हे नाटक विदर्भातील राजकन्या मालविका व शुंग घराण्यातील राजा अग्नीमित्र यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. तर विक्रमौर्वोशिव हे नाटक स्वर्गातील उर्वशी व पृथ्वीवरील राजा उर्वशी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. तर कालिदासाचे तिसरे नाटक शाकुंतल हे आहे. हे नाटक दुष्यंत व शकुंतला यांच्या कथेवर आधारित आहे.

२. विशाखादत्त याने मुद्राराक्षस व देवीचंद्रगुप्तम ही दोन नाटके लिहिली आहेत. मुद्राराक्षस हे नाटक मगधच्या गादीवर चंद्रगुप्त मोर्याच्या सत्ता स्थापन करण्यावर आधारित आहे. तर देवीचंद्रगुप्तम हे नाटक गुप्त सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्याने शकांचा पराभव करून सत्ता स्थापन करण्यावर आधारित आहे.

३. हर्षवर्धनाची  नाटके: सम्राट हर्षवर्धनही नाटककार होता. त्याने प्रियदर्शनी, रत्नावली व नागानंद अशी तीन नाटके लिहिली.  रत्नावली हे नाटक उदयन व सागरिका यांच्यावर प्रेमकथेवर आधारित आहे. तर नागानंद या नाटकावर बौध्द धर्माचा प्रभाव आहे. हर्षाने हिंदू व बौध्द धर्माचा मिलाफ घडवून आणण्याचा जो प्रयत्न केला त्याचे प्रतिबिंब या नाटकात पडले आहे. 

b.काव्ये

प्राचीन काळातील काव्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार महाकाव्य ज्यात रामायण व महाभारत यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार हा अभिजात काव्याचा आहे ज्यात कालिदासाचे रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, ऋतूसंहार, दंडीचे दशकुमारचरित, भारावीचे ‘किरातर्जुनाय’, दंडीचे ‘दशकुमारचरित’, भट्टीचे ‘रावणवध’, शिशुपालवध’ इ. काव्यग्रंथांचा समावेश होतो.

१. महाकवी कालिदास- इस ३५०ते ४६०च्या दरम्यान कालिदास होऊन गेला तो गुप्तांच्या नवरत्न दरबारातील एक विद्वान रत्न होता. त्याने चार काव्ये लिहिली आहेत. i.रघुवंश, ii.कुमारसंभव, iii. मेघदूत, iv. ऋतूसंहार ही होय.

c.शास्त्रीय ग्रंथ

या प्रकारात राजनीती, आरोग्य, गणित, ज्योतिष्य, भाषा इ. विषयावरील ग्रंथांचा समावेश होतो. 

१.कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’-

विष्णूपंत चाणक्य उर्फ कौटिल्य हा ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथाचा लेखक आहे.(काही इतिहासकर मात्र हा ग्रंथ कोणी एका माणसाने लिहिला नसून अनेक लोकांनी वेगवेगळ्या काळात लिहिल्याचे मानतात) चाणक्य हा मौर्य सम्राट चंद्रगुप्ताच्या दरबारात राजपुरोहित होता.(मात्र या ग्रंथात चंद्रगुप्ताचे नाव कोठेही आलेले नाही) १९०९मध्ये डॉ. रामशास्त्री यांनी या ग्रंथाचा शोध लावला. या ग्रंथात १५ प्रकरणे आहेत. ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असले तरी त्यात राजा, मंत्रीपरिषद, न्यायव्यवस्था, हेरपद्धती, करपद्धती, राजसत्तेच्या निर्मितीचा सिद्धांत, परराष्ट्र संबध, याची माहिती देण्यात आली आहे. राजाने मंत्री कसे निवडावेत, त्यांचा प्रामाणिकपणा व स्वामीनिष्ठा याची परीक्षा कशी करावी याची माहिती आहे. एकूणच मौर्य प्रशासन, अर्थनियोजन, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती, इ.ची माहिती मिळते.

२.पाणिनीचा ‘अष्टाध्यायी’ :

इसपु ७व्या शतकात पाणिनी याने ‘अष्टाध्यायी’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथात संस्कृत भाषेचे व्याकरण लिहिले आहे. 

३.चरक व सुश्रुत :

       चरक याने ‘चरकसंहिता’ तर सुश्रुतने ‘सुश्रुतसंहिता’ हे ग्रंथ लिहिले. हे दोन्ही ग्रंथ आयुर्वेदशास्त्राचा पाया घातला. चरक हा कुशाण सम्राट कनिष्क याच्या दरबारात राजवैद्य होता. वात-पित्त-कफ हे त्रिधातू व  त्रिदोष सिद्धांत मांडला.  सुश्रुतसंहितेत शरीरविज्ञानाची माहिती दिली आहे.  त्यात शल्यचिकित्सेची (surgery) माहिती दिली आहे. हे ग्रंथ भारत, इराण, अरबस्थान, या देशातही प्रसिद्ध होते.

४. आर्यभट्ट पाहिला (इ.स.४९९) :

गणित, खगोलशस्त्र व ज्योतिषशास्त्र या तिन्ही शास्त्रांमध्ये पारंगत असणारा आर्यभट्ट इ.स. ४९९ च्या दरम्यान गुप्त काळात होऊन गेला. त्याने प्राचीन विज्ञानाला पुढील योगदान दिले.

i. त्याने ‘आर्यभट्टीय’ हा ग्रंथ लिहिला. ii. वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, घातांक, क्षेत्रफळ, समीकरणे, त्रिकोणमिती, यांचा विचार त्याने वरील ग्रंथात मांडला आहे. iii.वर्तुळाचा परीघ त्याने मोजला. iv. सौर वर्ष ३६५ दिवस, १५ घटी, ३१ पळे व १५ विपळे असते असा वर्षाचा कालावधी त्याने सांगितला. त्याने मोजलेला कालावधी व आधुनिक काळात मोजलेला कालावधी यात ३ मिनिटे व १९ सेकंदाचा फरक आहे. v. पृथ्वी गोल असून आपल्या आसाभोवती फिरते, त्यामुळे दिवस-रात्र होतात. vi. सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्यास सूर्यग्रहण व पृथ्वीची छाया चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहण होते असे सांगितले. त्याने पाचव्या शतकात सांगितलेले सिद्धांत आजही विज्ञाच्या कसोटीवर खरे ठरतात. यावरून त्याचे महत्व लक्षात येते. म्हणूनच भारताने १९७५ साली अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव याच्याच नावावरून ‘आर्यभटट’ ठेवले आहे.

५.वराहमिहिर (४९०-५८७) :

i.हा एक खगोलतज्ञ होता. तो उज्जैनीच्या वेधशाळेचा संचालक होता. चंद्रगुप्त विक्रमादित्य च्या ‘नवरत्न दरबार’मध्ये त्याचा समावेश होता. ii. त्याने ‘पंचसिधान्तिका’ या ग्रंथात त्यामध्ये त्याने ग्रीकांच्या वैज्ञानिक कल्पना स्वीकारल्या. iii. त्यात १२ राशी व २७ नक्षत्रे यांचा संबंध जोडला आहे. iv. पृथ्वी गोल असून ती अंतरिक्षात अधांतरी फिरते हे पहिल्यांदा त्याने सांगितले. v. त्याचा दुसरा ग्रंथ ‘बृहतसंहिता’ आहे. त्यात त्याने फलज्योतिष सांगितले आहे. आकाशातील ग्रह, गोल, तारे माणसाच्या भवितव्यावर कसे परिणाम करतात त्याने या ग्रंथात विशद केले आहे. vi. ‘होरोशात्र’ म्हणजेच ‘कुंडली’ त्यातील ग्रहस्थानावरून व्यक्तीचे भविष्य वक्तावण्याचे शास्त्र होय. हे भारतीयांनी ग्रीकांपासून घेतले. vii. कालमापन करण्यासाठी त्याने ‘घटिकापात्र’ शोधून काढले.

६.ब्रह्मगुप्त ब्रह्मस्फुट सिद्धांत :

ब्रह्मगुप्ताने गणितावर आधारित ‘ब्रह्मस्फुट सिद्धांत’ मांडला. त्यामध्ये ‘पृथ्वीच्या अंगी पदार्थाला स्वत: कडे आकर्षित करण्याची शक्ती आहे’ असे मत मांडले. यालाच आज आपण ‘गुरुत्वाकर्षण शक्ती’ असे म्हणतो. जो शोध न्युटनच्या नावावर प्रसिद्ध आहे. कारण तो त्याने प्रयोगाने सिद्ध केला. न्यूटनच्या १००० वर्षे हा सिद्धांत तर्क शक्तीच्या आधारे ब्रह्मगुप्तांने मांडला.

७.नागार्जुनचा ‘रसरत्नाकर’ :

नागार्जुन हा प्राचीन काळातील एक विद्वान रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने ‘रसरत्नाकर’ हा रसायनशास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला

-----------------------------------------

E.परकीय प्रवासवर्णने :

प्राचीन काळापासून भारत हा जगाचे आकर्षण राहिला आहे. त्यातूनच ग्रीक, रोम, तिबेट, चीन या देशातील लोकांनी भारताला भेट दिली व या भारत भेटीतील अनुभव व माहिती त्यांनी लिहून ठेवली. ही माहिती प्राचीन भारताचा अभ्यास करताना उपयोगी पडते. 

१.ग्रीक इतिहासकारांनी भारताविषयी केलेल्या नोंदी:

इसपू तिसऱ्या शतकात भारतावर अलेक्झांडरने आक्रमण केले. त्याच्यासोबत आलेल्या इतिहासकारांनी भारताचे वर्णन केले आहेत. तसेच इतिहासाचा जनक असेलेल्या हिरोडोटसने भारताबद्दल लिहिले आहे. त्याने चंद्रगुप्त मोर्याची माहिती लिहिली आहे. टोलेमी याने ‘Geography’  हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात सातवाहन घराण्याची व भारताच्या भूगोलाची माहिती दिली आहे. प्लिनी याने ‘Natural Hisotry’ या ग्रंथात भारताच्या भूगोलाचे वर्णन केले आहे. भारतातील व्यापारी मार्ग व व्यापारी वस्तूंची तो माहिती देतो. एका अनामिक लेखकाने लिहिलेल्या ‘Periplus of the Eastherian Sea’  या ग्रंथात दक्षिण भारताची भौगोलिक व सांस्कृतिक माहिती आली आहे. डायोडोरासने भारताचा भूगोल व सती पद्धतीची माहिती दिली आहे.

२.मैगेजस्थिनीस चा ‘इंडिका’:

गेजस्थिनीस हा ग्रीक राजा सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील वकील होता. त्याने ५ वर्षे चंद्रगुप्ताच्या दरबारात वास्तव्य केले. त्याने जे पहिले ते लिहून ठेवले. पाटलीपुत्र शहर, शहराचे प्रशासन, चंद्रगुप्ताचे मुलकी व लष्करी प्रशासन, त्याचे साम्राज्यविस्ताराचे प्रयत्न इ. गोष्टी त्याने पहिल्या होत्या त्याचे वर्णन या ग्रंथात केले आहे. या ग्रंथाची मूळ प्रत उपलब्ध नाही. या ग्रंथाचा वापर करून नंतरच्या इतिहासकारांनी जो इतिहास लिहिला आहे त्यातून इंडिकाची माहिती मिळते. 

३.चीनी प्रवासवर्णने:

i.फाहीयान :

हा चीनी प्रवाशी इस ४०० ते ४१२ या दरम्यान भारतात आला. बौध्द स्थळांना भेटी देणे, बौध्द धर्माचा अभ्यास करणे, बौध्द धर्मावरील हस्तलिखिते मिळवणे हा त्याच्या भारत भेटीचा उद्देश होता. त्याने भारतातील पवित्र बौध्द स्थळांना भेटी दिल्या. तो दक्षिण भारतात गेला होता. त्याने त्यावर आधारित एक प्रवासवर्णन लिहिले. ते गुप्तकाळाची सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थितीची माहिती मिळवण्याचे एक उपयुक्त साधन आहे. भारतीय लोक हे धार्मिक, सदाचारी, विद्याप्रेमी व सत्यवचनी, अहिंसावादी होते असे त्याने लिहून ठेवले आहे. एकूणच ५ व्या शतकातील भारत समजून घेण्यासाठी फाहीयानचे लिखाण उपयुक्त ठरते.

ii. ह्यु एन-त्संग-

हा चीनी प्रवाशी इस ६३० ते ६४५ या काळात भारतात आला होता. बौध्द धर्माच्या परंपरांचा व तत्वज्ञानाचा अभ्यास करणे, बौध्द ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करणे, पवित्र बौध्द स्थळांना भेटी देणे हे त्याचे भारतभेटीचे उद्दिष्ट होते. तो संपूर्ण भारत फिरला.

सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात, नालंदा विद्यापीठात त्याचे काही काळ वास्तव्य होते. त्याने आपल्याबरोबर बुद्धांच्या जीवनाशी संबधित १५० अवशेष व ६५७ ग्रंथाची हस्तलिखिते नेली होती. ७ व्या शतकातील भारतीय समाज व संस्कृतीच्या अभ्यासासाठी त्याचे प्रवासवर्णन उपयुक्त ठरते. भारतातील विविध प्रांतातील लोकांची वैशिष्ट्ये त्याने प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे.

iii. इत्सिंग :

       हा चीनी प्रवाशी इस ६७६ ते ६८८ या काळात भारतात आला. ७व्या  शतकातील भारताचे वर्णन, तत्कालीन विद्यापीठांची माहिती विशेषत: वल्लभी विद्यापीठ(गुजरात), नालंदा विद्यापीठ (बिहार),  यांची माहिती तो देतो. ५६ बौध्द ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर इत्सिंगने केले.

 

 

 

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts